चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे शिवारात बिबट्याने पाडला चार शेळींचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:25 PM2018-10-21T12:25:39+5:302018-10-21T12:26:03+5:30

पावलांचे आढळले ठसे

The four goats were beaten by a leopard in the village of Wadgaon in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे शिवारात बिबट्याने पाडला चार शेळींचा फडशा

चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे शिवारात बिबट्याने पाडला चार शेळींचा फडशा

Next

चाळीसगाव, जि. जळगाव : वडगाव लांबे शिवारातील बबनराव राखुंडे यांच्या शेतात बांधलेल्या बक-यांवर रविवारी पहाटे बिबट्याने हल्ला चढवत चार शेळींचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने केलेल्या शोधमोहिमेत बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले आहे.
महादेव मंदिरालगत राखुंडे यांचे शेत असून शेतातील सालदार महादू कोळी हे शेतातच राहतात. त्यांच्याकडे आठ ते दहा बक-या आहेत. गावात कार्यक्रम असल्याने ते शनिवारी शेतात गेले नाहीत. बिबट्याने संधी साधत रविवारी पहाटे शेळ्यांवर हल्ला केला. दोन शेळ्यांना ऊसाच्या शेतात ओढून नेले. रविवारी कोळी हे शेतात परल्यानंतर त्यांचा हा प्रकार लक्षात आला. वनविभागाला कळविल्यानंतर त्यांनी सकाळी दहा वाजता शोध मोहिम राबविली. शेतात काही ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने वनविभागाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बिबट्याने गेल्या वर्षी वरखेडे परिसरात मोठा धुमाकुळ घातला होता. त्याला ठार करण्यात आले असले तरी परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरवाड्यात बिबट्याने भऊर परिसरात गुरांवर हल्ले केल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: The four goats were beaten by a leopard in the village of Wadgaon in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.