जळगाव शहरातील लिला पार्कमध्ये हल्ला करणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:08 PM2018-01-18T16:08:47+5:302018-01-18T16:11:21+5:30

आयोध्या नगरातील लिला पार्कमध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात अश्विन यशवंत सोनवणे (वय १८ रा.अजिंठा विश्रामगृह, जळगाव), धनराज कौतिक कोळी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), अबु उर्फ सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव (रा.कासमवाडी,जळगाव) व रवी अशोक भोई (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Four arrested for attacking Lila Park in Jalgaon City | जळगाव शहरातील लिला पार्कमध्ये हल्ला करणा-या चौघांना अटक

जळगाव शहरातील लिला पार्कमध्ये हल्ला करणा-या चौघांना अटक

Next
ठळक मुद्दे दोन महिन्यापूर्वी घडली होती घटना १६ जणांवर दाखल आहे गुन्हादोन जखमी रुग्णालयातच

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१८ :  आयोध्या नगरातील लिला पार्कमध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात अश्विन यशवंत सोनवणे (वय १८ रा.अजिंठा विश्रामगृह, जळगाव), धनराज कौतिक कोळी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), अबु उर्फ सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव (रा.कासमवाडी,जळगाव) व रवी अशोक भोई (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
उसनवारीचे शंभर रुपये न दिल्याच्या कारणावरुन २७ नोव्हेंबर रोजी आयोध्या नगरातील लिला पार्कमध्ये अभिषेक किसन मराठे व राकेश नारखेडे (रा.आयोध्या नगर, जळगाव) यांच्यावर हल्ला केला होता. या हल्लयात तलवार, लोखंडी रॉड, दगड व लाठ्या-काठ्यांचा वापर झाला होता. मराठे व नारखेडे हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी संगीता विकास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन १६ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी या चार संशयितांना गुरुवारी अटक केली.

Web Title: Four arrested for attacking Lila Park in Jalgaon City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.