माजी नगरसेवक मनोज चौधरींसह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:50 PM2017-10-02T21:50:21+5:302017-10-02T21:51:38+5:30

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम (३०७) लावण्यात आले आहे. दरम्यान, चौधरी यांच्यासह दोन्ही गटाच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक श्याम कोगटासह अन्य संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Former corporator Manoj Chaudhary and four others arrested | माजी नगरसेवक मनोज चौधरींसह चौघांना अटक

माजी नगरसेवक मनोज चौधरींसह चौघांना अटक

Next
ठळक मुद्देदुर्गा विसर्जन मिरवणुकीतील वाद मनोज चौधरीविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तर श्याम कोगटा फरारदोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २ : दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम (३०७) लावण्यात आले आहे. दरम्यान, चौधरी यांच्यासह दोन्ही गटाच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक श्याम कोगटासह अन्य संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल
खोटे नगरात रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता फटाके फोडण्याच्या कारणावरुन दोन मंडळांमध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यात सागर मुरलीधर पाटील, देवीदास वाघ व गणेश गायकवाड हे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.  या वादानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. त्यात सागर पाटील याच्या फिर्यादीवरुन माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी व श्याम कोगटा तसेच गणेश गायकवाड, समाधान रामभाऊ पाटील, निलेश शालीग्राम पाटील, धीरज महाजन, सम्राट बेलदार व इतर अशांविरुध्द तर दुसºया गटाकडून मनोज चौधरी यांंच्या फिर्यादीवरुन देविदास प्रल्हाद वाघ, शेख वसिम शेख सुपडू, कपील मुरलीधर पाटील, सागर मुरलीधर पाटील, सुधीर प्रल्हाद पाटील (सर्व रा.खोटेनगर, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.  देविदास व सागर वगळता तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.


मनोज चौधरी यांना ३ दिवस कोठडी
अटकेतील संशयिताना पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी सोमवारी न्या.एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता मनोज चौधरी यांना तीन पोलीस कोठडी सुनावली तरशेख वसिम शेख सुपडू, कपील मुरलीधर पाटील व सुधीर प्रल्हाद पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. घटनेतील चाकू व झेड्यांचा रॉड जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Former corporator Manoj Chaudhary and four others arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.