सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अतोनात हाल - चाळीसगाव येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 03:55 PM2019-03-23T15:55:04+5:302019-03-23T15:55:23+5:30

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्न साखळी जिवंत ठेवा

 In the forest of cement, halls of the birds' | सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अतोनात हाल - चाळीसगाव येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमातील सूर

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अतोनात हाल - चाळीसगाव येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमातील सूर

Next

चाळीसगाव : पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याचे संस्कार नकळतपणे बालवयात आपणावर रुजवले जातात. पण आताच्या सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्ष्यांना अन्न पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होतात, असा सूर येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाच्या समारोप्रसंगी उमटला. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात, यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी, असे आवाहन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत यांनी केले.
शहरातील चंपाबाई रामरतन कळंत्री महाविद्यालयात २३ रोजी ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाची सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्यावतीने शाळा, महाविद्यालयातून जनजागृती करण्यात आली असून शाळेतील आवारात मातीच्या भांड्यांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी मान्यवर उपस्थित होते.
..तर पक्ष्यांचा जीव वाचू शकतो
पाण्याच्या शोधात पक्षांना लांब भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, झाडावर, सावलीच्या ठिकाणी पाण्याचे भांडी भरुन ठेवल्यास हजारो पक्ष्यांचा जीव वाचू शकतो, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळातर्फे जागतिक चिमणी दिनापासून ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून याची सांगता शनिवारी करण्यात आली, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक स्वप्नील कोतकर यांनी दिली.
पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊल
यावेळी सुचित्रा पाटील यांनी सांगितले की, स्वत:पासून सुरुवात केली तर सर्व काही बदलू शकते. पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊल उचलण्याची गरज असून माणुसकीचा मूलमंत्र लक्षात ठेवून संस्थेच्यावतीने पक्ष्यांपर्यंत पाणी हा उपक्रम सुरु करण्याचा मानस हाती घेतला असून शहरातील विविध भागात परळ ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलत्या जीवनशैलीने पक्ष्यांची संख्या घटतेय
मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांनादेखील सर्व नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी आहे, तेव्हाच या उपक्रमाचे खरे सार्थक होईल, अशी भावना स्मिता बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.
अन् पक्षांना मिळाला आधार
२० ते २३ मार्च पर्यंत ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रम जागराने शहर ढवळून निघाले. पक्षीमित्र भावना जागविण्यात भरारी घेतली असून ही भावना आपल्यासह समाजामध्ये कायम रहावी यासाठी शहरातील विविध शाळांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे पालकांमध्ये विशेष कौतूक असून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात असलेली जुन्या भांड्यांची स्वत: परळ तयार करुन घराच्या परिसरात लावण्यासाठी हट्ट धरल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली असल्याचे या वेळी पालकांनी सांगितले.

Web Title:  In the forest of cement, halls of the birds'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव