भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 09:55 PM2019-07-21T21:55:34+5:302019-07-21T22:00:05+5:30

रावेर तालुक्यातील भोकरी येथील रासायनिक खतांचे उत्पादन करणाऱ्या दत्ता अ‍ॅग्रो प्रा.लि.कंपनीत २ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाºया अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांच्या मागावर पाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रावेर पोलिसांचे पाच पथके मध्यप्रदेशासह संशयीत ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली.

Five policemen escorted to the Bhokri arson investigation | भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना

भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना

Next
ठळक मुद्देरावेर : केºहाळे बुद्रूक येथील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांंसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशीघटनेचे सीसीटीव्ही फुटेज कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरी येथील रासायनिक खतांचे उत्पादन करणाऱ्या दत्ता अ‍ॅग्रो प्रा.लि.कंपनीत दरोडेखोरांनी तीनही सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधून व लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत त्यांना एका खोलीत डांबून २ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाºया अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांच्या मागावर पाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रावेर पोलिसांचे पाच पथके मध्यप्रदेशासह संशयीत ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली. दरम्यान, ‘छोटा और बडा ट्रान्सफॉर्मर किधर है’, अशी विचारपूस या दरोडेखोरांनी केल्याने सन २०१२ ते २०१४ दरम्यान ८ ते ९ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे रावेर व बºहाणपूर पोलिसात दाखल असलेल्या केºहाळा बुद्रूक येथील संशयितांना व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याचा प्रयत्न करून सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची हत्या करणाºया हेल्मेटधारी दरोडेखोरांच्या तपासात महिनाभरापासून पोलीस मागावर असताना तालुक्यातील भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर रोडवरील श्री दत्ता अ‍ॅग्रो कंपनीत अज्ञात ७ ते ८ चोरट्यांनी घातलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची नव्याने भर पडली आहे. भोकरी येथील या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे असला तरी, निंबोल बँक दरोड्याच्या गुन्ह्यातील तपासाकरीता ठाण मांडून असलेले फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी आता या दरोड्याच्या तपासाकडे मोर्चा वळविला आहे.
भोकरी शिवारातील रासायनिक खतांचे उत्पादन करणाºया दत्ता अ‍ॅग्रो कंपनीतील दरोड्याच्या घटनेचे दोन ते तीन मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. सीसीटीव्हीत कैद होत असल्याची जाणीव झाल्याबरोबर सीसीटीव्ही स्क्रीन काढून व कॅमेºयाच्या केबल्स तोडणारे दोन जण तोंडावर पांढरे रूमाल व एक तोंडावर काळा रूमाल बांधलेले दरोडेखोर एका साक्षीदारास हात मागे कमरेवर बांधून घेवून आल्याचे दिसत आहे. ज्यात एकाने पट्टेदार शर्ट घातल्याचे दिसत आहे. रूमालांवर केळीचे डाग पडलेले व केळी बागेतील खोडांना टेकणी लावलेले दांडके हातात घेऊन तोडफोड करताना त्यात दिसत असल्याने सदरचे आरोपी स्थानिक असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
दरम्यान, सुरक्षारक्षकांच्या समोर प्रवेशद्वारासमोर येताना कोणत्याही वाहनाचा आवाज वा प्रकाशझोत सुरक्षारक्षकांना दिसला नसल्याने, कारखान्याच्या डाव्या बाजूने अर्थात सुरक्षारक्षकांच्या कक्षाच्या पाठीमागे असलेल्या नाल्यातून दबा धरत हे चोरटे आल्याचा अंदाज असल्याने लगतच्या परिसरातीलचं सदरचे दरोडेखोर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संबंधित आरोपींना यांत्रिक स्पेअर्स पार्टसची व शुक्रवारी पगार होतात याची माहिती अवगत असल्याने सदर कारखान्यात त्याचा कामगार वा कामानिमित्त ये-जा करण्याचा वावर असण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. किंबहुना, एवढे अवजड यांत्रिक पार्टस मध्य प्रदेशासह, महाराष्ट्र वा गुजरात मधील औद्योगिक क्षेत्र असलेल्या भंगार बाजारात विकण्याची शक्यता असल्याने त्याबाबींवर पोलस पथके नव्हे तर खबरी द्वारे करडी नजर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, बºहाणपूर व रावेर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याची पुष्टीही फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी जोडली.
सदर दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच पोलीस अटक केल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास तपासाधिकारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी व्यक्त केला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी निंबोल व भोकरीच्या गुन्ह्यात अद्याप धागा गवसत नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Five policemen escorted to the Bhokri arson investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.