पथराड येथील शेतकऱ्यांनी कापसावर फिरविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:47 PM2017-12-04T16:47:56+5:302017-12-04T16:54:31+5:30

कृषी विभागाच्या सल्ल्यानंतर पथराड येथील शेतकऱ्यांनी घेतला निर्णय

The farmers of Pathrade rotated cotton on cotton | पथराड येथील शेतकऱ्यांनी कापसावर फिरविला रोटाव्हेटर

पथराड येथील शेतकऱ्यांनी कापसावर फिरविला रोटाव्हेटर

googlenewsNext
ठळक मुद्देपथराड येथील शेतात फिरविला रोटाव्हेटरवेचणीसाठी मजुर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्तशासनाने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
पथराड ता. धरणगाव,दि.४ : जळगाव जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला आहे. कृषी विभागाने शेतातील कापूस उपटून फेकण्याचा सल्ला दिला आहे. धरणगाव तालुक्यातील पथराड येथील शेतकऱ्यांनी शेतात रोटाव्हेटर फिरविला.
धरणगाव तालुक्यातील पथराड येथील शेतकरी कापसावरील बोंडअळी व मजुरांअभावी त्रस्त झाले आहे. शेतातील फुटलेल्या कापसावर रोटाव्हेटर फिरविण्यात आला. यावर्षी कापसावर झालेला खर्च देखील शेतकºयांचा निघालेला नाही. त्यातच कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त्र झाला आहे. मजुर मिळालाच तर बोंडअळी मुळे कापूस वेचण्यासाठी त्रास होत आहे. बोंडअळी मुळे संपूर्ण कापूस खराब झाला. मात्र कृषी विभागाकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी आलेले नाहीत. बोंडअळीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title: The farmers of Pathrade rotated cotton on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.