अंगावर पाण्याची टाकी पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:15 PM2019-03-22T14:15:23+5:302019-03-22T14:15:59+5:30

पाथरी येथील घटना

Farmer's death due to falling water tank | अंगावर पाण्याची टाकी पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अंगावर पाण्याची टाकी पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे बैलगाडीचा दांडा तुटला



जळगाव : बैलगाडीवरुन पाणी घेऊन जाताना गाडीचा दांडा तुटल्याने गाडीवरील टाकी अंगावर पडून रघुनाथ तुळशीराम गायकवाड (५५, रा.पाथरी) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता पाथरी, ता.जळगाव येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
रघुनाथ गायकवाड हे पाणी घेण्यासाठी बैलगाडीने शेतात गेले होते. पाचशे लीटरच्या टाकीत त्यांनी शेतातील विहिरीतून पाणी भरले. घरी परत येत असताना रस्त्यात बैलगाडीचा दांडा तुटला. त्यामुळे गायकवाड हे गाडीच्याखाली कोसळले व त्यांच्या अंगावर पाण्याने भरलेली टाकी पडली. त्याखाली दाबल्या गेल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारील शेतातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून गावात घटना कळविली. सरपंच शिरीष पाटील, माजी सरपंच निलेश पाटील, संतोष नेटके, पोलीस पाटील संजीव लंगरे, राहूल पाटील, पुतण्या हरीष गायकवाड व इतर लोकांनी तातडीने मदतकार्य राबवून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अतुल पाटील यांनी पंचनामा केला.
भावाचा प्रचंड आक्रोश
दरम्यान, शवविच्छेदनगृहात भावाचा मृतदेह पाहताच लहान भाऊ शांताराम यांनी त्यांनी एकच हंबरडा फोडला. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी कोकीळाबाई, मुलगा पवन, मुलगी अमृता, मनिषा व सरला यांच्यासह भाऊ सुकलाल, कैलास व शांताराम असा परिवार आहे.

Web Title: Farmer's death due to falling water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.