दहिगावच्या शेतक:याचा दुचाकीद्वारे कोळपणीचा प्रयोग

By admin | Published: July 12, 2017 04:02 PM2017-07-12T16:02:52+5:302017-07-12T16:02:52+5:30

प्रदीप पाटील यांनी केली तीन दिवसात सात बिघे जमिनीची मशागत

Farmers of Dahigan: Use of bicycling | दहिगावच्या शेतक:याचा दुचाकीद्वारे कोळपणीचा प्रयोग

दहिगावच्या शेतक:याचा दुचाकीद्वारे कोळपणीचा प्रयोग

Next
>जीवन चौधरी/ ऑनलाईन लोकमत 
दहिगाव,ता.यावल,दि.12 - पारंपारिक पद्धतीने बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणा:या शेतीच्या मशागतीच्या कामांना फाटा देत दहिगाव येथील प्रदीप पाटील या शेतक:याने दुचाकीच्या साहाय्याने कोळपणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अवघ्या तीन दिवसात सात बिघे जमिनीची मशागत करीत वेळे व पैशांची बचत या प्रयोगामुळे झाली आहे.
सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी नांगरटी, वखरणी, कोळपणी, पेरणी आदी शेतीच्या मशागतीची कामे करीत आहे. या माध्यमातून बैलजोडी व गाडीवरील तणाव कमी होत आहे. मात्र काहीसा यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रदीप पाटील या शेतक:याने काहीसा नवीन प्रयोग केला आहे. दुचाकीला कोळपे बांधून उडीद, मूग, पपई आणि कपाशी अशा चार पिकांची सात बिघे कोळपणी या शेतक:याने केली. तीन दिवसात साडे सहा तास मशागत करीत हा प्रयोग शेतक:याने यशस्वी केला. या दरम्यान मुलगा सुशांत याने पपई कोळपणीत मदत केली तर संतोष पाटील या मजुराने सहकार्य केले. या मशागतीसाठी चार लीटर पेट्रोल  व एका मजूराची तीन दिवस 450 रुपये मजुरी एवढा खर्च आला. हा नाविण्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी कोरपावली व दहिगावच्या शेतक:यांनी भेट दिली. या प्रयोगामुळे बैलजोडीचे 75 टक्के काम कमी होवून दुचाकीच्या माध्यमातून लवकरात-लवकर कामे पूर्ण होण्यास मदत होते.
 
एक तरुण दुचाकीवरून फवारणी करीत असल्याचा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर पाहिला होता. त्यानंतर मी स्वत:च तो प्रयोग लक्षात घेतला. फवारणी होते तर कोळपणी का होणार नाही? म्हणून त्वरीतच मी हा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. आता मी दुचाकीच्या सिटवर 40 लीटर किटकनाशक द्रव्याची टाकी बांधून दुचाकीला एका बाजूला पंप बांधून पिकांवर फवारणी करणार आहे.
प्रदीप वासुदेव चौधरी, शेतकरीे. 

Web Title: Farmers of Dahigan: Use of bicycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.