ज्येष्ठांचा अनुभव व तरुणांच्या परिश्रमाने व्यापारात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:52 PM2018-07-02T12:52:45+5:302018-07-02T12:54:33+5:30

महावीर सुराणा यांचा सल्ला

experience in the labor of youth | ज्येष्ठांचा अनुभव व तरुणांच्या परिश्रमाने व्यापारात यश

ज्येष्ठांचा अनुभव व तरुणांच्या परिश्रमाने व्यापारात यश

Next
ठळक मुद्देजैन सोशल गृप गोल्डतर्फे मार्गदर्शनचांगला अनुभव देणारे शिक्षण हवे

जळगाव : जीवनातील यशाचा मंत्र व्यापारात असून त्यात यश प्राप्ती करायची असेल तर तरुणांच्या परिश्रमाला घरातील ज्येष्ठांच्या अनुभव, मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे, असा सल्ला चेन्नई येथील उद्योजक, व्यापारी महावीर सुराणा यांनी दिला.
जैन सोशल गृप जळगाव गोल्डतर्फे रविवारी सायंकाळी कांताई सभागृहात महावीर सुराणा यांचे ‘व्यापाराकडून धर्मा’कडे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती दलुभाऊ जैन, माणकचंद सांड, शंकरलाल कांकरिया, ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बोरा उपस्थित होते.
चांगला अनुभव देणारे शिक्षण हवे
कमी शिकलेल्या व्यक्ती व्यापारात यशस्वी होत नाही, हा गैरसमज आहे. पैसे कमविणारे यंत्र बनविणारे शिक्षण नसावे तर ते चांगला अनुभव देणारे असावे, असे सुराणा म्हणाले.
काळानुरुप बदल स्वीकारा
जैन समाज हा नोकरी देणारा समाज असून हा समाज नोकरी मागणारा समाज कशासाठी होत आहे, असा सवाल सुराणा यांनी उपस्थित करीत व्यापारातील यशाचा मंत्र सांगितला. पूर्वीही व्यापार क्षेत्र चांगले होते व आजही ते चांगले आहे. यात केवळ काळानुरुप बदल स्वीकारणे, पारदर्शक व्यवहार ठेवणे, सरकारी नियमांचे पालन करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती टिकून ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आज तरुणाई केवळ चांगल्या नोकरीसाठी उच्च शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
आपल्या शहरातील यशस्वी व्यापाऱ्यांचा सल्ला घेत त्यांना रोल मॉडेल म्हणून समोर ठेवत व्यापाराबाबत त्यांच्याशी चर्चा करावी, असाही सल्ला सुराणा यांनी दिला.
सूत्रसंचालन साधना भंसाली यांनी केले. यशस्वीतेसाठी योगेश डाकलिया, अनिल पगारिया, विनोद भंडारी, मुकेश सुराणा, ईश्वर छाजेड, संदीप रेदासनी, सचिन चोरडिया, रमन छाजेड, तेजस कावडिया आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: experience in the labor of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.