सर्वांनाच हवी एलसीबी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:20 PM2018-05-03T13:20:25+5:302018-05-03T13:20:25+5:30

Everyone wants LCB .... | सर्वांनाच हवी एलसीबी....

सर्वांनाच हवी एलसीबी....

Next

सुनील पाटील
पोलीस दलात बदलीचे गॅझेट तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीतून दहा ते अकरा कर्मचारी बदलीपात्र तर काही जण निवृत्तीला आले आहेत. त्यामुळे आपल्याला एलसीबीत नियुक्ती मिळावी यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राजकीय नेत्याकडे तसेच येथून बदलून गेलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमार्फत अनेकांनी फिल्डींग लावली आहे. जिल्हा कार्यक्षेत्र, शिवाय आर्थिक गणित यामुळे बदलीपात्र अनेक कर्मचारी एलसीबीसाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्षमता असलेले व आर्थिक लोभ नसलेले अगदी बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी आहेत. मात्र त्यांच्या एलसीबी नियुक्तीला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. तर काही जण वर्षानुवर्षापासून प्रतिक्षेत आहे. एलसीबी या शाखेत खरे तर काम करण्यास प्रचंड वाव आहे. नवीन व उत्साही कर्मचाºयांना शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु गुन्हा उघडकीस आणण्यात अगदी नगण्यच कर्मचाºयांना रस आहे. इतर कर्मचारी आर्थिक आकडेमोडीतच मग्न आहेत. शंभराच्यावर संख्या असलेल्या या शाखेतून तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी अनेक कर्मचारी संख्या कमी केली होती, ती आता ७५ च्या घरात आली आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे आजच्या घडीला शेकडो कर्मचाºयांची नावे आलेली आहेत. त्यासाठी राजकीय, शासकीय अधिकाºयांसह अनेकांनी शिफासशीही केलेल्या आहेत. त्यामुळे एलसीबीला कर्मचारी नियुक्त करताना कराळे यांचा चांगलाच कस लागणार आहे. कराळे हे स्वत: कर्मचाºयांना जवळून ओळखत नाहीत. त्यामुळे विभागातील अधिकाºयांच्या शिफारसीवरच बहुतांश गोष्टी अवलंबून आहेत. कर्मचाºयाच्या कामाची पध्दत, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात ‘रिकव्हरी’ आदी मुद्दे प्रकर्षाने विचारात घेतले जाणार आहेत. काही कर्मचाºयांच्या नियुक्तया झाल्या आहेत तर काही येणाºया काळात होणार आहेत.

Web Title: Everyone wants LCB ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.