पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:12 PM2017-12-28T13:12:27+5:302017-12-28T13:16:17+5:30

व्यवहार ठप्प

Due to lack of water problem in Bodawad, city closed | पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद

पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद

Next
ठळक मुद्दे81 गावांचा पाणीपुरवठा 18 डिसेंबरपासून बंद 1 कोटि 55 लाख रुपये वीज बिल थकले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28-  जळगाव जिल्ह्यातील बोडवड शहरासह तालुक्यातील 26 तर  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 81 गावांचा पाणीपुरवठा योजनेतील गावांची पाणी समस्या सोडविण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बोदवड शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. 
 बोडवड शहरासह तालुक्यातील 26 तर  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 81 गावांचा पाणीपुरवठा 18 डिसेंबरपासून 1 कोटि 55 लाख रुपये वीज बिल थकल्याने बंद पडला आहे.  यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  20 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने या बाबत वारंवार तहसीलदार, नगरपंचायतमध्ये निवेदन देण्यात येऊन ही पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. तरीही समस्या कायम असल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने  बोडवड बंदचे आवाहन केले. त्यानुसार त्यात किराणा, कापड, सराफ व्यावसायिकांनी सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. 

Web Title: Due to lack of water problem in Bodawad, city closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.