‘डीपीडीसी’कडूनही मनपाला दिलासा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:37 AM2019-07-21T00:37:59+5:302019-07-21T00:38:38+5:30

पालकमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही

The DPDC also does not have any relief from the Municipal Corporation | ‘डीपीडीसी’कडूनही मनपाला दिलासा नाही

‘डीपीडीसी’कडूनही मनपाला दिलासा नाही

Next

जळगाव : शहरातील रस्त्यांची झालेली दूरवस्था व वाढत्या खड्ड्यांच्या उपाययोजनांसह मेहरुण तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून (डीपीडीसी) निधी मिळण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने डीपीडीसीकडून मनपाची निराशा झाली आहे. या सोबतच मनपाशी संबंधित गाळे व हुडको प्रश्नाबाबतही शुक्रवारी संध्याकाळी होणारी बैठकही न झाल्याने गाळेधारकांचाही अपेक्षाभंग झाला आहे.
सध्या अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची मोठी दूरवस्था झाली असून खड्ड्यांचेही मोठे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा मोठा रोष आहे. त्यात मनपाची बिकट स्थिती व काम करणाऱ्या एजन्सी कमी आहे. त्या मुळे कामे रेंगाळत आहे.
या प्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूल, खड्ड्यांबद्दल असलेली नाराजी पाहता एजंसी वाढवून मिळाव्यात, मेहरुण तलाव विकासासाठी निधी मिळावा, हुडको, गाळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र त्या वेळी डीपीडीसीचा मनपाशी संबंध नाही, असे एकनाथराव खडसे यांनी सांगून टाकले. त्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपण यासाठी संध्याकाळी बैठक घेऊ असे सांगितले.
विजेचे खांब स्थलांतरण रखडले
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी वीज वितरणकडून सहकार्य होत नसल्याची ओरड आहे. या कामासह इतरही ठिकाणचे विजेचे खांब स्थलांतरीत करण्यासाठी ५० लाखाच्या निधीची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती.
संबंध नाही, मात्र मदतीची अपेक्षा
तसे पाहता मनपाला डीपीडीसीकडून निधी मिळणार नाही, हे मान्य असले तरी मनपाची आर्थिक स्थिती पाहता निधीची तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र निधीबाबत थेट नकार देण्यात आल्याने मनपाच्या पदरी निराशीच आली.

या पूर्वी गणेश घाटाला मिळाला आहे निधी
मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधीची मागणी केली असता सकारात्मक उत्तर मिळाले नाही. तसे पाहता या पूर्वी मेहरुण तलावावरील गणेश घाटासाठी डीपीडीसीतून निधी मिळालेला आहे. त्यामुळे आताही मेहरुण तलावाच्या कामासाठी निधी मिळणे अपेक्षीत आहे.
बैठक झालीच नाही
डीपीडीसीचा मनपाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आल्याने हुडको, गोळे प्रश्नासंदर्भात संध्याकाळी बैठक घेऊ, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. मात्र संध्याकाळी ही बैठक झालीच नाही. त्यामुळे यावर काहीच चर्चा होऊ शकली नाही.
सकारात्मक निर्णय होईल
मागण्यांबाबत आपण अद्यापही सकारात्मक आहोत. मेहरुण तलावासाठी निधी मिळेलच. शुक्रवारी संध्याकाळी वेळेअभावी बैठक होऊ शकली नसली तरी पालकमंत्री गिरीश महाजन लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढतील. विशेष म्हणजे या बाबत पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांशीही चर्चा केली आहे. हुडको, गाळे प्रश्नाविषयी दिल्लीत झालेल्या बैठकीतील मुद्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तेही लवकर निर्णय घेतील
- सुरेश भोळे, आमदार .

Web Title: The DPDC also does not have any relief from the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव