भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:10 PM2019-01-06T18:10:19+5:302019-01-06T18:13:26+5:30

भडगाव येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

Distribution of literature to the devotees at Bhadgaon | भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत समितीच्या गटसाधन केंद्रामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरणशैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसले हास्य

भडगाव, जि.जळगाव : येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद झळकत होता.
हा कार्यक्रम भडगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राजवळ ४ रोजी पंचायत समिती पदाधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, पंचायत समिती सदस्य रावण भिल्ल, संजय पाटील, विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील यासह पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे कर्मचारी, पालक, नागरिक उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना पदाधिकाºयांच्या उपस्थितीत एक ट्रायसिकल, दोन सीपी चेअर, तीन कर्णयंत्र, तीन एम आर कीट, दोन रोलेटर व इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकामी निंबा परदेशी, सचिन पाटील, छाया महाजन, भगवान ढाके, प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of literature to the devotees at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.