एकतेचा संदेश : दिगंबर मुनींचे जैन श्वेतांबर मंदिरात प्रवचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:54 AM2019-04-18T11:54:31+5:302019-04-18T11:55:12+5:30

जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या इतिहासात पहिलाच योग

Digambara Muni's Jain Svetambara discourses | एकतेचा संदेश : दिगंबर मुनींचे जैन श्वेतांबर मंदिरात प्रवचन

एकतेचा संदेश : दिगंबर मुनींचे जैन श्वेतांबर मंदिरात प्रवचन

googlenewsNext

जळगाव : महावीर जयंतीनिमित्त शहरात आलेले जैन धर्मियांचे मुनी प.पू. १०८ आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे परम् प्रभावी शिष्य प.पू. १०८ अस्तिक्यसागरजी महाराज व १०८ प्रणीतसागरजी महाराज यांचे मंगळवारी संध्याकाळी श्री वासूपूज्य जैन मंदिरात प्रवचन झाले. १०० वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात प्रथमच दिगंबर जैन मुनींचे प्रवचन झाल्याने जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघात हा इतिहास घडला आहे. जैन धर्मात विविध संप्रदाय असले तरी या प्रवचनाने समाजबांधवांनी एकतेचा संदेश दिला.
गेल्या आठवड्यात या दिगंबर जैन मुनींचे शहरात आगमन झाले असून शिवाजीनगरातील श्री शांतीनाथ दिगंबर जैन (लाल) मंदिर येथे विराजमान आहे. मंगळवारी त्यांना जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्यावीने निमंत्रित करण्यात आले होते.
शहरातील श्री वासूपूज्य जैन मंदिर हे १०० वर्षे जुने असून जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्यावीने येथे विविध कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी श्वेतांबर मुनींचे आगमन होण्यासह त्यांचे प्रवचन होते. मात्र इतिहासात प्रथमच या ठिकाणी जैन मुनींचे आगमन होऊन त्यांचे प्रवचन झाले.
भगवान श्री वासूपूज्य जैन मंदिरात मुनीश्रींचे आगमन झाल्यानंतर तेथे त्यांनी भगवंतांचे दर्शन घेतले व संघ प्रमुख भागचंद बेदमुथा, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, महेंद्र रामसिना, राजेश जैन यांनी स्वागत केले.
अपेक्षा ठेवू नका..
या वेळी मुनीश्रींनी आपल्या प्रवचनात सांगितले की, कोणाचेही दोष दाखविण्यापेक्षा ते झाका. द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा अशा दोन्ही प्रकारच्या हिंसेपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. जीवनात जास्त अपेक्षा ठेवल्या तर समस्या वाढतात, त्यासाठी विना अपेक्षा जीवन जगल्यास ते सुकर होते.
या वेळी रमेश संघवी, नीरज कामथानी, प्रदीप जैन, जितेंद्र गांधी, सुमती टाटिया यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर बाझल यांनी मंगलाचरण सादर केले तर सूत्रसंचालन दिलीप गांधी यांनी केले.
यशस्वीतेसाठी धर्मनाथ नवयुवक मंडळाने परिश्रम घेतले.

Web Title: Digambara Muni's Jain Svetambara discourses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.