जळगावात निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:31 PM2018-07-20T12:31:52+5:302018-07-20T12:34:31+5:30

मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आढळून आला आहे. शनिपेठ भागातील भाजी विक्रेत्यांना तीन ते चार व्यक्तींनी या नोटा दिल्या असून, या भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी या सर्व नोटा ‘लोकमत’ कडे आणून दिल्या आहेत.

Detention of fake notes in Jalgaon elections | जळगावात निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांचा सुळसुळाट

जळगावात निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांचा सुळसुळाट

Next
ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांकडे आढळल्या नोटानागरिक व उमेदवारांनी खबरदारी घेण्याची गरजअंधाराचा फायदा घेत चालविल्या बनावट नोटा

जळगाव : मनपा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट आढळून आला आहे. शनिपेठ भागातील भाजी विक्रेत्यांना तीन ते चार व्यक्तींनी या नोटा दिल्या असून, या भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी या सर्व नोटा ‘लोकमत’ कडे आणून दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत वापर होणाऱ्या पैशांबाबत नागरिक व उमेदवारांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.
निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटपाचे गैरप्रकार होत असतात. मतदानाच्या एका दिवसापुर्वी रात्री पैसे वाटप होण्याची शक्यता असते. निवडणुकीच्याच पार्श्वभुमीवर शहरात बनावट नोटांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमरास शनिपेठ भागात काही भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना या शंभर रुपयांचा नोटा या काही ग्राहकांनी दिल्या होत्या. रात्री अंधार असल्याने या नोटांची फारशी तपासणी न करता विक्रेत्यांनी या नोटा स्विकारुन घेतल्या. मात्र, सकाळी हा प्रकार एका विक्रेत्याचा लक्षात आला. त्याने इतर विक्रेत्यांशी चर्चा केली. त्या दरम्यान, इतर विक्रेत्यांनी आपल्याकडील नोटा तपासून पाहिल्या असता. त्या स्पष्टपणे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर शनिपेठ भागातील शैलेंद्र सपकाळे यांनी विक्रेत्यांकडून नोटा घेवून ‘लोकमत’ कडे तक्रार केली.

Web Title: Detention of fake notes in Jalgaon elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.