आयुध निर्माणी कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:41 PM2018-09-12T18:41:56+5:302018-09-12T18:43:50+5:30

सरकारविरोधात व्यक्त केला असंतोष

Demolition Movement by Ordnance Factory Workers Association | आयुध निर्माणी कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन

आयुध निर्माणी कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्दे सकाळी साडेसात ते सायंकाळी पाऊणेपाचपर्यंत कर्मचाºयांचा सरकारविरोधात असंतोष व्यक्तसंघटनेतर्फे आठवडाभर आंदोलन होणार आंदोलनमहाव्यवस्थापकांमार्फत पंतप्रधानांना देणार निवेदन






भुसावळ : येथे आयुध निर्माणातील आघाडीची संघटना आयुध निर्माणी कर्मचारी संघातर्फे १२ रोजी धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात सकाळी साडेसात ते सायंकाळी पाऊणेपाचपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आपला असंतोष प्रकट केला. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात १२ रोजी सरकारने १ जानेवारी २००४ पासून लागू केलेली नवीन पेन्शन स्कीम रद्द करून जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यात यावी. यासाठी १० ते १५ सप्टेंबरपर्यंत संघर्ष सप्ताहाचे आयोजन केले आहे.
आयुध निर्माणी कर्मचारी संघ भुसावळ संघटनेने संपूर्ण आठवडाभर आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. यात सकाळी सात वाजता केंद्र्र सरकारच्या कर्मचारी विरोधी नीती विरोधी घोषणा मुख्य प्रवेशद्वार येथे द्वारसभा, विशाल धरणे, १२ रोजी दुपारी १२.३० भोजनावकाशात महाव्यवस्थापकांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे.
कर्मचारी आयुष्यभर नोकरी करून त्याला निवृत्तीनंतर महत्त्वाचा आधार असलेली पेन्शन सरकारने २००४ पासून हिरावून घेतली आहे. आप पेन्शन किती असेल याबाबत कुणाला काहीही सांगता येत नाही म्हणून कर्मचारी चिंतातूर झाले आहे. कर्मचाºयांना आपल्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संघटनेतर्फे यापुढे संपावर जाऊन मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलन यशस्वितेसाठी अध्यक्ष गजानन चिंचोलकर, सरचिटणीस किशोर पाटील यांच्यासह युनियनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


 

Web Title: Demolition Movement by Ordnance Factory Workers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.