रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:35 PM2019-04-20T12:35:28+5:302019-04-20T12:36:01+5:30

अकस्मात मृत्यूची नोंद

Death of a woman while crossing the railway rails | रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू

Next

जळगाव : शहरातील प्रजापत नगर परिसरातील रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्यामुळे कांचननगरातील कल्पना नाना सपकाळे (३५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
कल्पना या कांचन नगरात कुटूंबियासह वास्तव्यात होत्या़ त्या मजुरी करायच्या़ काही कामानिमित्त त्या शुक्रवारी प्रजापत नगराकडे गेल्या होत्या़
रात्री काम आटोपून घराकडे परतत असताना परिसरातील रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला़ यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सपकाळे यांना मृत घोषित केले़ यावेळी नातेवाईकांची एकच गर्दी झालेली होती़

Web Title: Death of a woman while crossing the railway rails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव