जळगावात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:50 PM2018-11-05T22:50:51+5:302018-11-05T23:02:27+5:30

कजगाव, आडगाव, गोद्री : जिल्हाभरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आडगाव शिवारात चारा कुट्टी खराब ...

Damage to the farm due to inclement weather in Jalgaon | जळगावात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान

जळगावात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान

Next
ठळक मुद्देकेळी व कापसाची हानीशेतकऱ्यांपुढील दुष्टचक्र सुरूचकजगाव परिसरात केळी जमीनदोस्तआडगावात तासभर पाऊस

कजगाव, आडगाव, गोद्री : जिल्हाभरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आडगाव शिवारात चारा कुट्टी खराब झाली. तर चाळीसगाव तालुक्यातील कजगाव जामनेर तालुक्यातील गोद्री येथे केळी व कापसाचे नुकसान झाले आहे.
कजगाव परिसरात केळीचे झाडे जमिनदोस्त
भडगाव तालुक्यातील भोरटेक शिवारात रविवारी रात्री झालेल्या वादळ वारा व पावसामुळे येथील रहीमशेठ बागवान यांच्या शेतातील चारशे ते पाचशे येलची (आंध्रा) या जातीचे केळीचे झाड जमीनदोस्त झाल्याने अंदाजे तीन ते साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे
रविवार ४ रोजी झालेल्या वादळ वारा व तुरळक पावसामुळे भोरटेक शिवारातील रहीमशेठ बागवान यांनी केलेल्या शेतातील येलची (आंध्रा)या जातीच्या केळीचे नुकसान झाले. या केळीचा आजचा भाव सहा हजार रुपये क्विंटल आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी याच केळीचा भाव नऊ हजार रुपये क्विंटल होता. अवकाळी पावसात केळीचे अंदाजे चारशे ते पाचशे कटाई वर आलेले झाड जमीनदोस्त झाल्याने तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केळीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
आडगावात तासभर पाऊस />पावसाळा संपला असतांना रविवारी मन्याड परीसरातील काही गांवामध्ये एक तासभर जोराचा पाऊस झाला. हा पाऊस दोन महिने अगोदर पडला असता तर शेतकºयांना खरीपातील चांगले उत्पन्न आले असते. विहिरींना व मन्याड धरणात पाणी आल्याने रब्बीचा हंगाम घेता आला असता.

Web Title: Damage to the farm due to inclement weather in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.