पेन्शन घ्यायला जाणा-या सायकलस्वार वृध्दाला डंपरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:27 PM2019-06-11T17:27:14+5:302019-06-11T17:30:02+5:30

सायकलीने बॅँकेत पेन्शन घ्यायला जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता.धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता एस.टी.वर्कशॉपजवळ घडली. शिंदे यांच्या डोक्यावरुन टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.

The cyclists who took the pensions crushed the old man with the dump | पेन्शन घ्यायला जाणा-या सायकलस्वार वृध्दाला डंपरने चिरडले

पेन्शन घ्यायला जाणा-या सायकलस्वार वृध्दाला डंपरने चिरडले

Next
ठळक मुद्दे जळगाव शहरातील एस.टी.वर्कशॉपजवळील घटना  संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडून चालकाला चोपले

जळगाव : सायकलीने बॅँकेत पेन्शन घ्यायला जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता एस.टी.वर्कशॉपजवळ घडली. शिंदे यांच्या डोक्यावरुन टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर हल्ला चढवून चालकाला बेदम चोप दिला. एमआयडीसी व शहर वाहतूक पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने चालकाचा बचाव झाला. त्याला जमावाच्या तावडीतून सोडवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नरेंद्र रमेश मराठे (२२, रा.पार्वती नगर, जळगाव) असे डंपर चालकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर शिंदे हे एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झाले होते. मंगळवारी ते स्टेट बॅँकेत पेन्शन घेण्यासाठी घरुन सायकलीने निघाले. एस.टी.कर्मचाºयांच्या निवासस्थानाकडून येत असताना नेरी नाका स्मशानभूमीकडून माती घेऊन येत असलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड.८०२४) वळण घेत असताना शिंदे यांना चिरडले. डंपरचे टायर शिंदे यांच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावर सर्वत्र मांसाचे तुकडे पडलेले होते.
बॅँकेच्या पासबुकवरुन पटली ओळख
शिंदे यांच्याजवळ बॅँकेचे पासबुक होते. त्यावरुन त्यांनी ओळख पटली. तेथून नागरिकांनी शिंदे यांचा मुलगा किरण याला घटनेची माहिती दिली. तो एमआयडीसीत कंपनीत होता. तो येण्याआधी पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता.दरम्यान, याच डंपरमध्ये सायकल टाकून ते शनी पेठ पोलिसात नेण्यात आले. रवींद्र चौधरी यांच्या मालकीचे डंपर असल्याचे सांगण्यात आले. डंपर चालक मद्याच्या नशेत होता,असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

Web Title: The cyclists who took the pensions crushed the old man with the dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.