विदेशी कंपनीचे बनावट खाते तयार करुन जळगावात ४१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:04 PM2018-08-31T13:04:34+5:302018-08-31T13:05:50+5:30

आॅनलाईन फसवणूक

Creating fake accounts of foreign company and raising Rs 41 lakh in Jalgaon | विदेशी कंपनीचे बनावट खाते तयार करुन जळगावात ४१ लाखांचा गंडा

विदेशी कंपनीचे बनावट खाते तयार करुन जळगावात ४१ लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देइंग्लडशी व्यवहारबॅँकेचा खाते क्रमांक बदलविला नसल्याचे स्पष्ट झाले

जळगाव : इंग्लडमधील स्टार फ्रॉस्ट (यु.के.) लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट बॅँक खाते तयार करुन मे.स्टार कुलर्स अ‍ॅन्ड कंडेन्सर्स, प्रा.लि.जळगाव या कंपनीला ४१ लाख २८ हजार ४४८ रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीत एच.१८ येथे असलेल्या मे.स्टार कुलर्स अ‍ॅन्ड कंडेन्सर्स या कंपनीचा इंग्लड येथील स्टार फ्रॉस्ट लि.या कंपनीशी झालेल्या करारानुसार स्टार फ्रॉस्ट ही कंपनी यंत्र बनविण्यासाठी तांत्रिक डिझायनबाबत सेवा पुरविते. त्यांचे तज्ज्ञ मदतनीस भारतात येऊन कुलर्सचे डिझाईन तपासून सल्ला देतात. त्याचा मोबादला म्हणून स्टार कुलर्स या कंपनीकडून कंपनीच्या ईमेल पत्त्यावरील बॅँक खात्यावर आॅनलाईन व्यवहार चालतो. जळगावच्या कंपनीचे बॅँक खाते अ‍ॅक्सीस बॅँकेत आहे. तेथून पैसे पाठविले जातात. ७ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट दरम्यान जळगावचे कंपनीने ४१ लाख २८ हजार ४४८ रुपये पाठविले. स्टार कुलर्स या कंपनीच्या ईमेल आयडीवर इंग्लडच्या कंपनीकडून सुधारीत नवीन बदललेला खाते क्रमांक पाठविण्यात आला होता. त्यानुसार बॅँक व्यवस्थापकांना हा खाते क्रमांक बनावट असल्याची शंका आली. त्यानुसार कंपनीचे संचालक सुशीलकुमार ओमकुमार असोपा (रा.गणपती नगर, जळगाव) यांनी बॅँकेत जावून चौकशी केली तसेच इंग्लडच्या कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी बॅँकेचा खाते क्रमांक बदलविला नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Creating fake accounts of foreign company and raising Rs 41 lakh in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.