गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:34 PM2023-09-28T22:34:03+5:302023-09-28T22:34:12+5:30

जळगाव शहरातील कोर्ट चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी  मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते.

Controversy over queuing for Ganpati immersion; A case has been registered with the city police | गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल

गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोर्ट चौकात गणपती विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरून मंडळांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवार २८ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 जळगाव शहरातील कोर्ट चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी  मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते. शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.

Web Title: Controversy over queuing for Ganpati immersion; A case has been registered with the city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.