जळगावात वाढदिवसाच्या पार्टीत वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:05 PM2018-09-02T13:05:37+5:302018-09-02T13:05:50+5:30

The controversy over a birthday party in Jalgaon | जळगावात वाढदिवसाच्या पार्टीत वादंग

जळगावात वाढदिवसाच्या पार्टीत वादंग

Next

जळगाव : शहरातील शेरा चौक व पिंप्राळा हुडको भागात रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाल्याच्या घटना घडल्या. 
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेरा चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलतानी व पटेल या दोन गटात वाद झाले.
नूर मोहम्मद पटेल (रा.शेरा चौक परिसर) यांच्या घरात घुसून त्यांना आरोपी मुसा रमजान मुलतानी व आसीफ मुलतानी आणि अनस मुलतानी या तिघांनी मद्यपान करुन मारहाण केल्याची तक्रार नूर मोहम्मद यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाल दिली. त्यावरुन रात्री १ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तर मुलतानी गटातर्फेही पटेल यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे वृत्त कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे व विजय पाटील यांनी धाव घेतली. काही तरुणांना ताब्यात घेतले.
वाढदिवसाच्या पार्टीत वादंग
पिंप्राळा हुडको परिसरातही रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भिल्ल व मांग या दोन समाजातील तरुणांमध्ये वाद झाले. वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पिंप्राळा हुडकोत रात्री प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी धाव घेतली व काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

Web Title: The controversy over a birthday party in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.