भडगावात घरगुती कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 05:20 PM2018-01-19T17:20:29+5:302018-01-19T17:23:59+5:30

नगरपालिकेतर्फे वैशाली पाटील यांचा सन्मानपत्र व पैठणी देऊन सत्कार

Compost fertilizer production from domestic waste in Bhadgaon | भडगावात घरगुती कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती

भडगावात घरगुती कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती

Next
ठळक मुद्देवैशाली पाटील यांनी घरगुती कचºयापासून तयार केले कंपोस्ट खतनगरपालिकेतर्फे करण्यात आला सन्मानपत्र व पैठणी देऊन सत्कारवैशाली पाटील यांचा अन्य महिलांनी आदर्श घेण्याचे केले नगरपालिकेने आवाहन

आॅनलाईन लोकमत
भडगाव, दि. : पाचोरा रोडवरील रहिवासी वैशाली राजेश पाटील यांनी घरगुती कचºया पासून परसबागेसाठी कंपोस्ट खत तयार केले आहे. हे खत परसबागेत चांगल्या पद्धतीने उपयोगी होत असल्याने त्याची दखल घेत भडगाव नगरपालिकेतर्फे त्यांचा राहत्याघरी जाऊन सन्मानपत्र व पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील, ओमकार शौचे, नितीन पाटील, आरोग्य कर्मचारी छोटू वैद्य, नगरसेवक अतुल पाटील, जगन भोई, कमलाकर देशमुख, विशाल महाजन, कल्याण देशमुख, नितीन पवार उपस्थित होते. महिलांनी घरातील दररोजचा निघणारा कचरा बाहेर न फेकता घरीच कंपोस्ट खत तयार करावे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल. वैशाली पाटील यांचा अन्य महिलांनी आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी नगरपालिकेतर्फे करण्यात आले.

Web Title: Compost fertilizer production from domestic waste in Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.