गोलाणी मार्केटची पूर्ण स्वच्छता करा, अन्यथा घरचा रस्ता - जिल्हाधिकारी

By admin | Published: July 17, 2017 12:58 PM2017-07-17T12:58:31+5:302017-07-17T12:58:31+5:30

गोलाणीतील स्वच्छतेमुळे रहिवाश्यांनी जिल्हाधिका:यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानल़े

Completely clean the cement market, otherwise the street of the house - the collector | गोलाणी मार्केटची पूर्ण स्वच्छता करा, अन्यथा घरचा रस्ता - जिल्हाधिकारी

गोलाणी मार्केटची पूर्ण स्वच्छता करा, अन्यथा घरचा रस्ता - जिल्हाधिकारी

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 17 - गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेला सोमवारी सकाळी 6 वाजता सुरुवात झाली़ स्वत: जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सफाई कामगारानी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला़ तीन तास उलटूनही पुरेसी स्वच्छता न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत काम न करणा:या सर्व कर्मचा:यांना कमी करण्याची तंबी दिली़ शौचालयाचे तुटलेले दरवाजे, नळ, अग्निशमन यंत्रणा दुरुस्ती यासह आवश्यक साहित्यासाठी तातडीने अहवाल तयार करुन सादर करण्याच्या सूचना दिल्या़ मार्केटमधील काही गाळे, मोठे हॉल रिकामे व अस्वच्छतेमुळे पडून त्याचाही अहवाल मागवून ते तत्काळ दुरुस्ती करुन शासकीय कार्यालयांना भाडय़ाने देण्याचे आदेशही त्यांनी दिल़े अनेक वर्षानंतर गोलाणीतील स्वच्छतेमुळे रहिवाश्यांनी जिल्हाधिका:यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानल़ेजिल्हाधिकारी तीन तास मार्केटमध्येजिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी 6 वाजता गोलाणी मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली़ सफाई कर्मचा:यांसह आरोग्य विभाग, बांधकाम विभाग,स्थापत्य, अतिक्रमण निमरूलन, पाणीपुरवठा, विद्युत या विभागाचे प्रमुख तसेच सर्व कर्मचारी कामाला लागले होत़े सात वाजता किशोराजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा मार्केटमध्ये दाखल झाल़े सात ते दहा या वेळेत जिल्हाधिका:यांनी प्रत्येक मजल्यावर सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला़ यादरम्यान त्यांनी आरोग्य अधिकारी विकास पाटील, तसेच स्थापत्य विभागाचे नरेंद्र जावळे यांना आवश्यक त्या सूचना व आदेश दिल़े यावेळी कर्मचारी, अधिका:यांची चांगलीच धावपळ उडाली होती़ तीन वेळा जिल्हाधिकारी गोलाणीतील पाच मजले चढले व उतरल़े प्रत्येक मजल्यावर ते कामाचा आढावा घेतांना दिसून आल़े

Web Title: Completely clean the cement market, otherwise the street of the house - the collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.