सहकार राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाला महामार्गावर चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:45 PM2017-11-14T12:45:32+5:302017-11-14T12:47:06+5:30

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय ४२, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर मुसळी फाट्यावर मेहरुणमधील जावेद शेख या तरुणाला चिरडले होते. या महामार्गावर सलग दुसरा अपघात आहे.

Co-operative minister's cousin's brother-in-law crashed on the highway | सहकार राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाला महामार्गावर चिरडले

सहकार राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाला महामार्गावर चिरडले

Next
ठळक मुद्देपाळधी ‘बायपास’वर सलग दुसरा अपघात अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक
नलाईन लोकमतजळगाव, दि.१४ : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय ४२, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर मुसळी फाट्यावर मेहरुणमधील जावेद शेख या तरुणाला चिरडले होते. या महामार्गावर सलग दुसरा अपघात आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू पाटील हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत चालक म्हणून कामाला होते. सोमवारी पहिल्या पाळीत ते ड्युटीला होते. ड्युटी आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.१९-२११३) जळगाव शहरात आले. काम आटोपल्यानंतर घरी जात असताना पाळधी गावात जाणाºया रस्त्यावर (बायपास) समोरुन येणाºया अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला तर दुचाकी लांब फेकली गेली. या अपघातात पाटील जागीच गतप्राण झाले.मुलाला दिली नाही मृत्यूची माहितीअपघात झाल्याचे समजताच जि.प.सदस्य प्रताप पाटील, राजू पाटील यांचा मुलगा गौरव व गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, राजू पाटील हे मयत झाले याबाबत त्यांच्या मुलाला माहितीदेणे टाळण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाटील यांच्या पश्चात पत्नी लताबाई, मुलगा गौरव, भाऊ शिवाजी असा परिवार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Co-operative minister's cousin's brother-in-law crashed on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.