खड्डेमय रस्ते हीच आता शहराची नवीन ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:48 AM2019-07-21T00:48:44+5:302019-07-21T00:49:07+5:30

आनंद सुरवाडे जळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली बिकट अवस्था बघून कोट्यवधींच्या गप्पा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे का दुर्लक्ष ...

The city's new identity is just as paved roads | खड्डेमय रस्ते हीच आता शहराची नवीन ओळख

खड्डेमय रस्ते हीच आता शहराची नवीन ओळख

Next

आनंद सुरवाडे
जळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली बिकट अवस्था बघून कोट्यवधींच्या गप्पा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे का दुर्लक्ष होते हा प्रश्न उपस्थित करून स्मार्ट सीटी हे केवळ स्वप्नच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे़ ज्या शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे वाहनधारकांच्या जीवावर उठत असतील, नागरिक मुलभूत सुविधांसाठी झगडत असतील त्या शहरातील नागरिकांना स्मार्ट सीटीचे स्वप्न पडत तरी असतील का ? आणि ऐवढा वेळ या नगारिकांना सत्ताधाऱ्यांनी दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
जळगावातील महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनला आहे़ दर आठवड्याला किमान एक अपघात अशी भयावह परिस्थिती या महामार्गावर झाली आहे़ खराब साईडपट्ट्या जीवघेण्या ठरत आहे़ अगदी जीव घेण्या इतका रस्ता खराब होईपर्यंत दुरूस्ती केली जात नाही महामार्गाचा विषय अधांतरीच असताना शहरातील अंतर्गत मार्गांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांनी डोके वर काढले आहे़ चित्रा चौकात एक भला मोठा खड्डा होता़ तो प्रत्येक नागरिकाला दिसत होता़ महापालिका प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींचा नियमित नसेल पण कधीतरी या रस्त्याने जाण्याचा प्रसंग येतच असेल, असे आताना हा खड्डा बघूनही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी दुर्लक्षित केला़ अखेर या खड्ड्याने एक बळी घेतला़ त्यानंतर प्रशासन जागे झाले, व मलमपट्टीला सुरूवात झाली़ इतकी असंवेनशिलता जर अधिकारी व लोकप्रतिनिधींची खुलेआम निदर्शनास येत असेल तर सामान्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे़

Web Title: The city's new identity is just as paved roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव