जळगाव जिल्ह्यात ट्रक लुटमारीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:16 PM2018-03-18T21:16:54+5:302018-03-18T21:16:54+5:30

छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या.

The Chief Contributing Officer of the robbery case in Jalgaon district was arrested | जळगाव जिल्ह्यात ट्रक लुटमारीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

जळगाव जिल्ह्यात ट्रक लुटमारीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

Next
ठळक मुद्दे बुलडाणा येथून केली अटक आणखी एक जण फरार संशयिताचा आहे ढाबा

आॅनलाईन लोकमत
जळगाव :जळगाव : छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यापासून पलविंदर सिंग फरार होता.   जलेरायकुमार भजनलाल पाल (वय २८ रा.हर्शीतविहार, हिरापूर टाटीबंध, रायपूर (मध्यप्रदेश) या ट्रक चालकाला अलिशान कारमधून आलेल्या ९ जणांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून ४ लाख ८० हजाराचे बिम व १७ हजार रुपये रोख असा ४ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली होती. यातील दोन वाहने पहिल्याच दिवशी जप्त करण्यात आली तर तिसरा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आता पर्यंत सात जणांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले असले तरी यातील  पिस्तुलबाबत मात्र उलटसुलट चर्चा आहे. 

Web Title: The Chief Contributing Officer of the robbery case in Jalgaon district was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.