चाळीसगाव पालिकेची सभा पुन्हा झाली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 09:08 PM2019-02-13T21:08:22+5:302019-02-13T21:55:42+5:30

तीन दिवसांपूर्वी बाहेरील विषयांवरुन तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधरण सभा बुधवारी पुन्हा झाली. सभेत काही विषयांवर वादळी चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.

Chalisgaon municipality's meeting again went on | चाळीसगाव पालिकेची सभा पुन्हा झाली वादळी

चाळीसगाव पालिकेची सभा पुन्हा झाली वादळी

googlenewsNext
ठळक मुद्देकाही विषय गाजले संगणक खरेदीस्मशानभूमी विषयांवरही झाली चर्चाशासनाच्या अभिनंदनाचा ठराव

चाळीसगाव, जि.जळगाव : तीन दिवसांपूर्वी बाहेरील विषयांवरुन तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधरण सभा बुधवारी पुन्हा झाली. सभेत काही विषयांवर वादळी चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. काही विषयांवर सभेत वादळी चर्चा होत असयानाच 'कचरेवाला आया...कचरा निकालो...' या स्वच्छता अभियानातील गीतावरुन नगरसेवकांनी विनोद केल्याने काही काळ हास्याचे कारंजेही उडाले. एकूण ६७ विषय मंजुर करण्यात आले.
सोमवारची सभा सूर्यकांत ठाकूर यांच्या विषयावरून तहकूब झाली होती. बुधवारी ही सभा सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते संजय रतनसिंग पाटील यांच्यासह नगरसेवक, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा विभागातील साहित्य खरेदीबाबत प्रश्न उपस्थित झाला. चौकशी करण्याची मागणीही झाली. यावर गदारोळ झाल्यानंतर पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे यांनी सभागृहात माहिती दिली. सोमवारी तहकूब झालेल्या सभेत सूर्यकांत ठाकूर यांच्या उपस्थितीवरून वादंग झाले होते. घृष्णेश्वर पाटील यांनी त्यांच्या निलंबनाची मागणीही केली होती. बुधवारीही भाजपाच्या सदस्यांनी ठाकूर यांच्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अभिनंदनाचा मांडला ठराव
छत्रपती शिवरायांंच्या पुतळ्यासंदर्भात सर्व अडचणी दूर झाल्यामुळे लवकरच आपल्या शहरात अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. याचा शहरवासीयांना आनंद आहे. याकरिता मुख्यमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी. पाटील यांच्यासह आमदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यासाठी नितीन पाटील अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावेळी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा झाल्या. या ठरावावर बोलताना शविआ राजीव देशमुख यांनी सांगितले की, आता पुतळा उभारणीसाठी लागणाºया परवानग्या मिळवण्यासाठी पालिकेने तातडीने पाऊले टाकावीत.
भुयारी गटारीबाबत रामचंद्र जाधव यांची सूचना
रामचंद्र जाधव यांनी गेल्या सभेच्या इतिवृत्तात माझ्या मागणीची नोंद घ्यावी, असे सांगत सभागृह डोक्यावर घेतले. त्यांनी मागणी केली की, भुयारी गटार योजनेचे काम झाले पाहिजे. याबाबत कोणालाही अडचण नाही. मात्र प्रभागातील सुवर्णाताई नगर झोपडपट्टीला धक्का न लावता भुयारी गटारीचे काम व्हावे. मागील सभेत माझी भूमिका स्पष्ट केली होती. तिची नोंद घ्या. माझ्यासह चार पाच नगरसेवकांच्या या जिव्हाळाच्या प्रश्नावर पालिकेने लक्ष द्यावे. अन्यथा मला खोलात जायला लाऊ नका, असे निक्षून सांगितले. यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली.
पाणीपुरवठा साहित्य निविदा, पाणी एटीएम मशीन, सर्व्हे नंबर ३२५/क या जागेच्या विकासासाठी आरक्षणात बदल, संगणक पुरवठ्यातील अनियमितता आदी विषयांवर चर्चा झाली. कब्रस्तान व स्मशानभूमीसाठी आरक्षित जागेचा विकास करावा. तेथे भाजीपाला मार्केट इतर नागरी सेवा सुविधा करण्यासाठी आरक्षणात बदल करावा, असा विषय घृष्णेश्वर पाटील यांनी मांडला. त्यावर तासभर चर्चा झाली. यात संजय पाटील, चिराग शेख, आनंदा कोळी , दीपक पाटील, सुरेश स्वार, मानसिंग राजपूत, अरुण अहिरे यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला. मात्र ही चर्चा भरकटत असताना मोठा गदारोळ माजला. यावेळी राजेंद्र चौधरी यांनी हस्तक्षेप करीत यावर पडदा टाकला. संगणकाच्या प्रश्नावरही गरमागरम चर्चा झाली. पालिकेने मागणी केलेल्या कंपनीचा संगणक न देता तो असेंबल असल्याचे नगरसेवक दीपक पाटील यांनी निदर्शनास आणून देत संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सभेत आनंद खरात, रवींद्र चौधरी, सुरेश चौधरी, शेखर बजाज, शेखर देशमुख, सूर्यकांत ठाकूर, श्यामलाल कुमावत यांच्यासह जवळपास सर्वच सदस्य उपस्थित होते.

Web Title: Chalisgaon municipality's meeting again went on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.