कॅप्टन आॅफ द शिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:32 PM2018-09-15T15:32:25+5:302018-09-15T15:32:31+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत नाट्याचे अभ्यासक डॉ.हेमंत कुलकर्णी...

Captain of the Ship | कॅप्टन आॅफ द शिप

कॅप्टन आॅफ द शिप

Next

नाटक ही समूहाने समूहासाठी करावयाची कला आहे. नाटक एकटी व्यक्ती एकपात्रीच्या रूपाने करतही असेल पण त्याला रंगमंचावर त्याची कला सादर करण्यासाठी अनेकांचा हातभार हा लागतच असतो. ही कला सादर करण्यासाठी नाटककार, नट, तंत्रज्ञ याची जश्ी गरज असते तशीच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीची गरज असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक.
कोणतेही सामूहिक कार्य पूर्णत्त्वास नेण्यासाठी सबळ नेतृत्वाची गरज असते. काम करणाऱ्या समूहास ते काम पुढे नेण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते. दिशा दाखवणाºयाची गरज असते. जसे जहाज समुद्रातून योग्य त्या बंदरावर पोहोचविण्यासाठी खलाशांच्या मदतीने कुशल असा कॅप्टनच हे काम करू शकतो. समाजकारण असो, राजकारण असो किंवा कोणतेही सामूहिक कार्य असो कोणीतरी एक हा सर्वात पुढे असणे आवश्यक असते. ज्याच्या भरोशावर सारी टीम कार्यरत होत असते. कलेच्या प्रांतात हा असा कॅप्टन नवीन नाही.
जो दिशा दाखवतो तो दिग्दर्शक इतकी साधी सोपी व्याख्या करता येईल. दिशा कोणती तर नाटकाकाराने लिहिलेले नाटक नट आणि तंत्रज्ञाद्वारे जी काही क्रिया होते त्याला मार्गदर्शन करणारी सर्जनशील आणि असर्जनशील कार्यात वाक्बगार असलेली व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक लेखकाचे नाटक आधी तो वाचतो आणि आपल्या मनातल्या रंगमंचावर सर्वप्रथम तो बघतो.
लेखकाचं नाटक तो खºया अर्थाने तो व्हिज्युअलाईज करतो आणि मग हे व्हिज्युअलायजेशन प्रत्यक्षात आणण्यासाठी तो नटांच्या मदतीने आणि तंत्राच्या कुशल कार्याने तो रंगमंचावर आणतो. लेखकाने कागदावर केलेली शब्दरूप कल्पना तो प्रत्यक्षात आणतो. या सगळ्या कामात त्याचा रोल काय तर जॅक आॅल ट्रेड अ‍ॅण्ड मास्टर आॅफ वन असा असतो तो सगळ्या कामात ट्रेंड असणे तर आवश्यक तर आहेच पण त्याची खरे कौशल्य हे त्याच्या दिग्दर्शनात असते.
दिग्दर्शक हा रंगभूमीच्या जुनेपणाचा विचार करता अलीकडचा म्हणता येईल. जागतिक रंगभूमीचा विचार करता सर्वप्रथम नटांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे सूत्रधार, त्या नाटककंपनीचा मालक त्या नंतर हे काम नाटककाराकडे आले, पुढे जावून नाटकाच्या कंपनीच्या मॅनेजरकडे आले केवळ सोय म्हणून नाटकाच्या तालमी घेणाºया माणसाकडे म्हणजे तालीम मास्तराकडे हे काम आले आणि मग कामाचे विभाजीकरण व विशेषीकरण व्हावे या हेतूने दिग्दर्शक अस्तित्वात आला.
लेखक आपले नाटक शब्दात मांडून आपले काम संपवतो खरा. पण त्या कामाची खरी सुरुवात दिग्दर्शकापासून होते. त्या नाटकाची पात्र योजना, तालमी, तंत्रयोजना, जाहिरात, बजेट इ. अशा अनेक कामात त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असतो.
निर्मितीतल्या प्रत्येक कृतीला तो जबाबदार असतो. केवळ नाटक निर्मित करून त्याचे काम संपत नाही तर त्या नाटकाचा प्रेक्षकांसमोर होणारा प्रयोग पाहून पुन्हा त्यावर चिंतन करून त्यातील उणे अधिक चा विचार करून तो प्रयोग पुन्हा सिद्ध सिद्ध करीत असतो.
अनेक प्रयोगानंतर सुद्धा हे नाटक ताजं कसं राहील याची जबाबदारी त्या दिग्दर्शकाची असते. बरं एवढं करून ते नाटक लोकांना आवडलं तर ठीक नाहीतर नेहमीप्रमाणे अपयशाचं खापर नेत्याच्या डोक्यावर फोडलं जातं. जसं लेकरू वाया गेलं याचा सगळा दोष जसा आईवर थोपवला जातो तसं.
लेखकाचे शब्द, काम करणारे नट, त्यांना साथ देणारे तंत्रज्ञ यांची जी काही सामूहिक कृती होते ती कृती आणि प्रेक्षक यांच्यातील सगळ्यात मोठा दुवा हा दिग्दर्शक असतो. तो केवळ रंगमंचापुरती पहात नाही तर ज्याच्यासाठी ही सगळी उठाठेव असते त्या प्रेक्षकांचा तो सतत विचार करून त्याच्यासाठी तो काम करीत असतो.
परमेश्वर या विश्वनाट्याचं संचालन करतो अशी आपली भावना आहे. हा सृष्टीचा गाडा तो चालवतो.
तसाच या नाट्यरूपी विश्वाचा गाडा यशस्वीरित्या हाकणारा, रंगमंचावर दृश्य स्वरूपात प्रतिसृष्टी निर्माण करणारा दिग्दर्शक नेहमीच वंदनीय आहे.


 

Web Title: Captain of the Ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.