बससेवा बंदमुळे प्रवाशांचे हाल

ठळक मुद्दे20 गाडय़ांचे नुकसानरेल्वे वाहतूक सुरळीत

जळगाव- बुधवारी दुपारी 12 वाजेपासून बससेवा पूर्णत: बंद पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. काही गावांना रेल्वे व इतर पर्याय नसल्याने बसस्थानकावर अनेक प्रवासी बस केव्हा सोडली जाते याची वाट पाहत तासंतास बसून होते. भिमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदचा फटका राज्यपरिवहन महामंडळाच्या बससेवेला मोठय़ा प्रमाणावर बसला. मंगळवारी दुपारी झालेल्या बसेस तोडफोडीच्या घटनेमुळे त्यानंतर मंगळवारी दुपार नंतर तसेच दुस:यादिवशी बुधवारीही अनेक बसफे:या रद्द करण्यात आल्या. सकाळी सुटल्या काही बसेस बुधवारी सकाळी जळगाव स्थानकातून काही बसेसे ग्रामीण भागासाठी सोडण्यता आल्या. 82 ग्रामीण भागासाठी तर 45 सिटीबसेसच्या फे:या होवू शकल्या. मात्र परिस्थिती पाहता हळू हळू फे:या कमी करीत 11 च्या दरम्यान बसफे:या पूर्णत: बंद करण्यात आल्या.विद्याथ्र्याचे हालजळगाव येथे शिक्षणासाठी ये- जा करणा:या विद्याथ्र्यांचे हाल बसेसअभावी मोठय़ा प्रमाणात झाले. विद्यार्थी- विद्यार्थीनी बराच वेळ बस स्थानकावर येवून बसले होते. शेवटी काहींनी खाजगी वाहनांचा शोध घेतला. काहींना गावाकडे जाणारे मोटरसायकलस्वार शोधत आपली सोय लावून घेतली. खाजगी प्रवासी वाहतूूकही बंदशहरातून जवळपासच्या गावांना जाणा:या कालीपिली तसेच ट्रॅक्स आदी खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या गाडय़ाही बंद होत्या यामुळे प्रवाशांचा हा पर्यायही संपुष्टात आल्याने गैरसोयीमध्ये अधिकच भर पडली. खाजगी बसेसुळे मिळाला आधारनेरी नाका परिसरातील खाजगी बससेवा मात्र तुरळकस्वरुपात सुरु होती यामुळे प्रवाशांना बराच दिलास मिळाला. या ठिकाणाहून जिल्ह्यातील काही गावांना बससेवा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास थोडी तरी मदत झाली. 20 गाडय़ांचे नुकसानमंगळवारी दगडफेकीत जिल्ह्यात 20 बसेसचे नुकसान झाले. यामुळे राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 8 लाख रुपयांचा फटका बसला. यात यावलच्या सर्वाधिक 4 बसेसचे नुकसान झाले.436 बसफे:या बंद जिल्ह्यातील विविध डेपोच्या एकूण 436 बसफे:या बुधवारी 3 रोजी दुपार र्पयत बंद झाल्या. यामुळे महामंडळास 18 लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तर मंगळवारी दुपार नंतर बंद झालेल्या 421 बसफे:या रद्द मुळे साडेसात लाखांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सुरळीत रेल्वे वाहतुकीवर बंदचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व गाडय़ा सुरळीतपणे धावत होत्या. प्रवाशांची सख्या मात्र काही प्रमाणात कमी दिसून आली. बंदच्या वातावरणामुळे अनेकांनी बाहेरगावी जाणे टाळले.
Web Title: Bus passengers stopped due to bus service shutdown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.