विद्यापीठाजवळ ‘द बर्निंग ट्रक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:39 PM2019-07-22T12:39:31+5:302019-07-22T12:40:30+5:30

रात्री ११ वाजेची घटना : लाखोंचे नुकसान, साहित्य जळून खाक

 The Burning Truck Near University | विद्यापीठाजवळ ‘द बर्निंग ट्रक’

विद्यापीठाजवळ ‘द बर्निंग ट्रक’

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर जळगावहून नाशिकला घरातील साहित्य घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकने पेट घेतल्याची शनिवारी घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. मिनी ट्रकला लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झालेले आहे़
शहरातून संसारोपयोगी साहित्य घेवून मजीद भाई हे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. बांभोरी सोडल्यानंतर अचानक गाडीने पेट घेतला. जैन कंपनीपासून मिनी ट्रक चालकाला मागून येत असलेले काही दुचाकीस्वार आवाज देत होते़ पण पाऊस सुरू असल्याने चालकाने काच बंद केले होते़ त्यामुळे आवाज ऐकू गेला नाही. विद्यापीठाच्या गेटजवळ एका दुचाकीस्वाराने पुढे येऊन ट्रक थांबवला असता चालकाला तुमच्या वाहनाने पेट घेतल्याचे सांगितले़ मात्र, तोपर्यंत मिनी ट्रकमधील ७० टक्के सामान जळून खाक झालेला होता. स्थानिक लोक, सुरक्षा रक्षक आणि जैन इरिगेशनच्या अग्निशामक विभागाची बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट
आयशरमध्ये संसारोपयोगी साहित्य होते. त्यात असलेल्या फ्रिजमधील कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, या आगीमुळे ट्रकचेही नुकसान झाले असून लाखो रूपयांचे संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे़
 

Web Title:  The Burning Truck Near University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.