वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:47 PM2018-10-15T22:47:47+5:302018-10-15T22:48:51+5:30

वरणगाव शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.

 Brutal killing of Vitbattichalkar in Varangaaga | वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या

वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देपैशाच्या देवाण घेवाणीतून खून झाल्याचा संशयश्वानपथकातील जंजिरा श्वान घटनास्थळाजवळच घुटमळले.ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी जमिनीवर पडलेल्या रक्ताचे नमुने घेतले.

वरणगाव, जि.जळगाव : शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. दरम्यान, खुनाच्या घटनेने वरणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चौधरी हे रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शिवाय त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफ मिळत असल्याने घरच्यांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. सोमवारी सकाळी वरणगाव पोलीस ठाण्यात सुनील चौधरी हरविल्याची नोंद दाखल करण्यात आली. यानंतर काही वेळातच त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
आर्थिक देवाण घेवाणीतून खून
चौधरी हे वीटभट्टी व्यवसायासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच व्यवहाराच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून त्यांचा खून झाल्याचा संशय त्यांचा मुुलगा तुषार चौधरी यांनी व्यक्त केला.
सुनील चौधरी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत फुलगाव फाट्यानजिक त्यांच्या वीटभट्टीवर होते. त्यानंतर ते घराकडे निघाले. परंतु ते घरी पोहचलेच नाही.
निर्घृण खून
साईनगराच्या शेवटी नवीन बांधकाम झालेल्या घराजवळ सुनीलला अज्ञात मारेकऱ्यांनी गाठून त्यांची दुचाकी एका बाजूस फेकून दिली. विटांनी त्यांचा चेहरा व डोके ठेचून खून केला. त्यांचा मृतदेह घराच्या आडोशाला फेकून दिला. त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी व अंगठी घेऊन मारेकरी घेऊन पसार झाले. मारेकºयांनी अत्यंत निर्दयपणे सुनील चौधरी यांची हत्या केली. मारेकºयांची क्रूरता इतकी भयानक होती की, त्यांचा चेहरा त्यांनी रेतीच्या ढिगाºयात खुपसला होता. त्यामुळे त्याच्या तोंडात, नाकात व कानातही रेती भरलेली होती.

जळगाव येथील सामान्य रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
तुषार चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकºयांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे करीत आहेत.
कुटुंबियांचा आक्रोश
मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. कुटुुंबियांना खुनाची घटना समजताच त्यांनी आक्रोश केला. तो पाहून उपस्थितांची मने हेलावली.
दरम्यान, घटनास्थळी मुक्ताईनगचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी भेट देत अधिकाºयांना तपासकामी सूूचना केल्या. येथे रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यस्वंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, त्याआधारे आरोपी दृष्टिक्षेपात असल्याचे पोलिसांनी सांगितले.




 

Web Title:  Brutal killing of Vitbattichalkar in Varangaaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.