चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:59 PM2019-02-19T14:59:52+5:302019-02-19T15:01:57+5:30

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Boycott of upcoming election for victims of Solar project in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रारबोढरे व शिवापूर शेतकºयांची फसवणूकनिवेदनाच्या प्रति प्रशासनाकडेसात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने सुरू केला वीज निर्मिती प्रकल्प

चाळीसगाव, जि.जळगाव :  तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसीलदार कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वषार्पासून पीडित शेतकरी हे शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. महसूल राज्यमंत्र्यांकडे दोनवेळा या बाबतच्या बैठका झाल्या. त्यांनी चौकशीचे आदेश देवूनही शेतकºयांना न्याय मिळालेला नाही. शंभरपेक्षा अधिक शेतकºयांची फसवणूक झाल्याप्रकरणी महसूल प्रशासनाकडे हरकती घेतल्या आहेत. खरेदी व्यवहाराला दीड ते दोन वर्ष उलटला मात्र सात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या कंपन्यांकडे अधिकृत कागदपत्रदेखील नाही ही बाब मुंबई येथे झालेल्या राज्यमंत्री राठोड यांच्या समोर उघडकीस येवूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पीडित शेतकºयांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पीडित शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति प्रधान मंत्री नवी दिल्ली, मुख्यमंत्री मुंबई, तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भरत चव्हाण, भीमराव जाधव, प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर भाई शेख, राजू चव्हाण, विश्वजीत नायक, देवेंद्र कुमार नायक आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Boycott of upcoming election for victims of Solar project in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.