धिंगाणा घालणारे ‘एलसीबी’चे दोन्ही पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:27 PM2017-11-21T22:27:40+5:302017-11-21T22:29:35+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात हाणामारी करणारे पोलीस कर्मचारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोघांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. निलंबन काळात येवले यांना चोपडा तर सोनवणे यांना रावेर मुख्यालय देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन कर्मचाºयांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. 

Both the police lobbyists 'LCB' were suspended | धिंगाणा घालणारे ‘एलसीबी’चे दोन्ही पोलीस निलंबित

धिंगाणा घालणारे ‘एलसीबी’चे दोन्ही पोलीस निलंबित

Next
ठळक मुद्दे तडकाफडकी कारवाई  पोलीस अधीक्षकांनी घेतले फैलावरहाणामारी करणे भोवले


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२१ : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात हाणामारी करणारे पोलीस कर्मचारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोघांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. निलंबन काळात येवले यांना चोपडा तर सोनवणे यांना रावेर मुख्यालय देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन कर्मचा-यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. 
या हाणामारीची चर्चा जिल्हाभर वा-यासारखी पसरल्याने पोलीस दलाची बदनामी झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सोमवारी सायंकाळीच दोन्ही कर्मचा-यांचा तसेच घटनास्थळावर हजर असलेल्या कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक  कराळे यांनी दोघांना त्यांच्या दालनात बोलावून चांगलेच फैलावर घेतले.
बोलविता धनी वेगळाच
येवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारी प्रकरणात बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये होती. आर्थिक व्यवहार ताब्यात घेण्यासाठीच या कर्ताकरविता धनीने या प्रकरणाला खतपाणी घातल्याची चर्चा पोलीस कर्मचा-यांमध्ये होती.दरम्यान, येवले यांच्या कुटुंबाविषयी अतिशय अश्लिल मजकूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शौचालयात लिहिण्यात आलेला आहे. पोलीस दलातील अंतर्गत वाद किती खालच्या पातळीवर पोहचले आहेत हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.

Web Title: Both the police lobbyists 'LCB' were suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.