बालेकिल्ल्यातच भाजपापुढे उमेदवारीचा पेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:01 AM2019-03-15T11:01:30+5:302019-03-15T11:02:37+5:30

हाती उरले मोजकेच दिवस

BJP's candidature for BJP ... | बालेकिल्ल्यातच भाजपापुढे उमेदवारीचा पेच...

बालेकिल्ल्यातच भाजपापुढे उमेदवारीचा पेच...

Next
ठळक मुद्दे प्रचारासाठी होणार कसरत

जळगाव: लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदार संघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी अद्यापही भाजपाकडून चर्चेच्या फेऱ्याच सुरू असल्याने बालेकिल्ल्यातच या पक्षापुढे मोठा पेच उभा राहिला असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक १० फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. निवडणुकीपूर्वी युती विरूद्ध आघाडी अशी लढतही ठरली.
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे पक्षातील पदाधिकारी सांगतात. या मतदार संघातून विरोधी गटातून आघाडीतर्फे राष्टÑवादीकडील ही जागा कॉँग्रेसकडे येणार असेही सांगितले जात आहे. तसे झाल्यास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते.
मात्र या संदर्भातील आघाडीची घोषणा अद्याप बाकी आहे.
या दोन दिवसात त्यावर निर्णय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
उमेदवाराची होणार कसरत
जळगाव लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, अमळनेर, एरंडोल-पारोळा व चाळीसगाव असे मतदार संघ आहेत. उमेदवारीत बदलाची शक्यता लक्षात घेता नव्या उमेदवारास नागरिकांपर्यंत जाण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रचारात मोठ्या अडचणी निर्माण होण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचा प्रचार गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत या मतदार संघात उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याचीच चिन्हे भाजपापुढे आहे.
‘क्लीप’ ठरतेय डोकेदुखी... पक्षात उमेदवारीबाबत पेच निर्माण झाल्याची वेगवेगळी कारणे राजकीय क्षेत्रात चर्चेत आहेत. उमेदवारी देतांना अतिशय सावध पवित्रा पक्षाकडून घेतला जात आहे. याचे पक्षांतर्गत विरोधकांनी काहींच्या केलेल्या गत काळातील ‘व्हीडीओ क्लीप’ हेही एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघ
४जळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. अगदी पक्षाचे नेते उत्तमराव पाटील यांच्या काळापासून या मतदार संघात जवळपास भाजपानेच यश मिळविले आहे. मात्र यावेळी उमेदवारी जाहीर करण्याचा पेच या मतदार संघात दिसून येत आहे. या संदर्भात अद्याप केवळ दावे प्रतिदावे सुरू आहेत. आमदार स्मिता वाघ, पारोळा पालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, तांत्रिक सल्लागार असलेले प्रकाश पाटील या तिघांची नावे आघाडीवर आहेत. पक्षातील बडी मंडळी प्रकाश पाटील यांच्यासाठी जिद्दीने कामाला लागली आहेत. मात्र ज्येष्ठता व पक्ष कार्याच्या जोरावर स्मिता वाघ व राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर करण पवार उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. तर ‘क्लिप’मध्ये अडकलेले व इतर स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

Web Title: BJP's candidature for BJP ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.