बांद्रा-पटना एक्सप्रेसमधील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:00 PM2017-11-04T17:00:44+5:302017-11-04T17:08:03+5:30

बांद्रा-पटना व्हाया उधना (क्र.१९०४९) या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मारहाण करुन लुटमार करणाºया टोळीतील फरार वसीम अली शेर अली उर्फ वसीम तेली (वय २५ रा.सालार नगर, जळगाव) याला शनिवारी जिल्हा पेठ पोलिसांनी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातून अटक केली. या प्रकरणात यापूर्वी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Bandra-Patna Express arrested in absconding gang rape | बांद्रा-पटना एक्सप्रेसमधील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक

बांद्रा-पटना एक्सप्रेसमधील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देएक महिन्यापासून होता फरार नंदूरबारला आहे गुन्हा दाखलयापूर्वी ९ जणांना झाली आहे अटक

आॅनलाईन लोकमत
 जळगाव दि,४: बांद्रा-पटना व्हाया उधना (क्र.१९०४९) या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मारहाण करुन लुटमार करणाºया टोळीतील फरार वसीम अली शेर अली उर्फ वसीम तेली (वय २५ रा.सालार नगर, जळगाव) याला शनिवारी जिल्हा पेठ पोलिसांनी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातून अटक केली. या प्रकरणात यापूर्वी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


गेल्या महिन्यात २ आॅक्टोबर रोजी  बांद्रा-पटना व्हाया उधना (क्र.१९०४९) या एक्सप्रेसमध्ये दहा ते पंधरा दरोडेखोरांनी पाच प्रवाशांना बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड असा ३२ हजाराचा ऐवज लुटून नेल्याची थरारक घटना नंदूरबार ते चावलखेडा या स्थानकादरम्यान मध्यरात्री साडे बारा ते दुपारी अडीच या वेळेत घडली होती. या थरारक घटनेनंतर जळगाव पोलीस, नंदूरबार लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून १२ तासातच ९ जणांना अटक केली होती. या प्रकरणात वसीम तेली हा फरार होता. तो जळगाव शहरात आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे भास्कर पाटील यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी रवींद्र वंजारी व रवी तायडे हे दोन कर्मचारी पाटील यांच्या दिमतीला दिले. या पथकाने दुपारी ट्रान्सपोर्ट नगरात सापळा रचून तेली याला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला घेण्यासाठी नंदूरबार लोहमार्गचे सहायक निरीक्षक योगेश पाटील व त्यांचे पथक जळगावला रात्री उशिरापर्यंत पोहचणार आहे.

Web Title: Bandra-Patna Express arrested in absconding gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.