सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे अंगलट; हिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर गुन्हा दाखल

By अनिल गवई | Published: February 27, 2024 03:30 PM2024-02-27T15:30:42+5:302024-02-27T15:31:11+5:30

पोलीस कायदा तसेच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवा हिंदू प्रतिष्ठाणच्या प्रमुख सहा जणांसह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Assembling public places without permission; | सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे अंगलट; हिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे अंगलट; हिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर गुन्हा दाखल

खामगाव: परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी हुंकार सभा आयोजित करणे, हिंदू युवा प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्यांच्या अंगलट आले आहे. पोलीस कायदा तसेच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवा हिंदू प्रतिष्ठाणच्या प्रमुख सहा जणांसह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, युवा हिंदू प्रतिष्ठाणच्यावतीने २५फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथे विनापरवानगी हुंकार सभा आयोजित करण्यात आली. जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचा आदेश व कलम  135 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५  चे उल्लंघन केल्याचे पो.हे.काँ. विनोद सखाराम राठोड यांनी शहर पोलीस स्टेशनमधील तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून रोहीत पगारीया, सुनील उर्फ शिवा जाधव, पंकज अंबारे, अतुल पाटील, मनोज ठोंबरे, विक्की सारवान आणि इतरांविरोधात मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

Web Title: Assembling public places without permission;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.