कळवाडी फाट्यानजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, ग्रामस्थांकडून हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:34 AM2022-09-29T09:34:08+5:302022-09-29T09:34:51+5:30

चाळीसगाव - मालेगाव रस्ता : बुधवारी रात्रीची घटना

A leopard died in a collision with a vehicle near Kalwadi Fata in jalgaon chalisgaon | कळवाडी फाट्यानजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, ग्रामस्थांकडून हळहळ

कळवाडी फाट्यानजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, ग्रामस्थांकडून हळहळ

Next

जिजाबराव वाघ

चाळीसगाव जि.जळगाव : चाळीसगांव-मालेगांव रस्त्यावर कळवाडी फाट्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचाअपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री उशीरा घडली असून वनविभागाने या घटनेला दूजोरा दिला आहे. गुरुवारी सकाळी वाहनाने जाणाऱ्या प्रवाश्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर वनविभागाला कळविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अलिकडच्या काळात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या शेतात, कधी गावच्या वाड्यावस्तीतही बिबट्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे, गावकऱ्यांसह वन विभागाचीही मोठी धावपळ पाहायला मिळते. आता, पुन्हा एकदा अशाच मानवी वस्तीत जात असताना वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे. दरम्यान मालेगाव वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जात आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: A leopard died in a collision with a vehicle near Kalwadi Fata in jalgaon chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.