जळगावात भागात डेंग्यूचे 7 संशयित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:26 PM2017-08-18T12:26:09+5:302017-08-18T12:27:21+5:30

सर्वेक्षण : धुरळणी, फवारणी सुरू;नागरिकांमध्ये भीती

7 suspected Dengue patients in Jalgaon area | जळगावात भागात डेंग्यूचे 7 संशयित रूग्ण

जळगावात भागात डेंग्यूचे 7 संशयित रूग्ण

Next
ठळक मुद्देमनपाकडून सर्वेक्षणएकनाथ  नगरातही डेंग्यूचा रूग्ण सात जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 -  महाबळ परिसरातील संभाजीनगर भागात एका युवकास डेंग्यू झाल्याचे आढळून आल्याने गुरूवारी केलेल्या तपासणीत आणखी 7 जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले. 
महाबळ परिसरातील संभाजीनगरात एका युवकास डेंग्यू झाला असून याच परिसरातील  अन्य चार जण खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याबाबत  ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाचे पथक या परिसरात  गुरूवारी तातडीने पोहोचले. 
परिसरात विविध उपाय योजना
संभाजीनगर परिसरात आरोग्य विभागाडून तातडीने साफसफाई मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच सकाळी धुरळणीही करण्यात आली, मात्र र¨हवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले.
आरोग्य विभागाचे आवाहन
परिसरातील नागरिकांनी घरातील कुलर, गच्चीवरील टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात, त्यातील पाणी फेकून ते कोरडे करून घ्यावे असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांनी केले आहे. 

रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील एकनाथ नगरातही एका मुलास डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त आहे. या मुलावर एका खाजगी रूग्णालयात        उपचार सुरू आहेत. या भागात धुरळणी, साफसफाई तसेच पाण्यात अबेट टाकण्याची मोहीम सुरू करावी  अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
परिसरात मनपा वैद्यकीय विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. तापाचे रूग्ण  असल्यास त्यांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणात सात जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आता कोणताही त्रास नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

Web Title: 7 suspected Dengue patients in Jalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.