म्हसावद येथे चोरट्यांनी लांबविले ६३ हजारांचे बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:12 PM2018-06-12T21:12:22+5:302018-06-12T21:12:22+5:30

म्हसावद गावातील लमांजन रस्त्यावर असलेले देवेंद्र रमेश जाधव (वय-२७, रा़ कळमसरा, ता़पाचोरा) यांच्या जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६३ हजार रूपये किंमतीचे कापूस बियाण्याचे ९० पाकिट तर मका बियाणे ५ पािकट चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़

63,000 seeds have been extracted by the thieves in Mhasawad | म्हसावद येथे चोरट्यांनी लांबविले ६३ हजारांचे बियाणे

म्हसावद येथे चोरट्यांनी लांबविले ६३ हजारांचे बियाणे

googlenewsNext
ठळक मुद्देकापूस बियाण्यांचे ९० तर मका बियाण्यांचे ५ पाकिट लंपासअ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून केली चोरीमंगळवारी सकाळी झाला प्रकार उघड

जळगाव- म्हसावद गावातील लमांजन रस्त्यावर असलेले देवेंद्र रमेश जाधव (वय-२७, रा़ कळमसरा, ता़पाचोरा) यांच्या जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६३ हजार रूपये किंमतीचे कापूस बियाण्याचे ९० पाकिट तर मका बियाणे ५ पािकट चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़
देवेंद्र जाधव हे कळमसरा येथे वास्तव्यास असून लमांजन रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या कॉम्पलेक्समध्ये त्यांचे जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सी हे बियाणे विक्रीचे दुकान आहे़ सोमवारी जाधव हे नेहमीप्रमाणे दिवसभरातील काम आटोपून रात्री ८़३० वाजता दुकानाला कुलूप लावून निघून गेले़ मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकवून आत प्रवेश केला़ त्यानंतर ५८ हजार ५०० रूपये किंमतीचे कापुस कापुस बियाण्यांचे ९० पाकिट तसेच ४ हजार ५०० रूपये किंमतीचे मका बियाण्यांचे ५ पाकिट असे एकूण ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ मंगळवारी सकाळी ६़३० वाजता नेहमीप्रमाणे जाधव हे दुकानावर आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर कपाशी व मका बियाण्यांचे पाकिट चोरीचे लक्षात आले.

Web Title: 63,000 seeds have been extracted by the thieves in Mhasawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.