भडगाव तालुक्यात ५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ५ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 03:26 PM2019-06-13T15:26:12+5:302019-06-13T15:27:53+5:30

४ पोटनिवडणुका आणि १ पंचवार्षिक निवडणूक

5 seats of 5 Gram Panchayats in Bhadgaon taluka are unanimously elected | भडगाव तालुक्यात ५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ५ जागा बिनविरोध

भडगाव तालुक्यात ५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ५ जागा बिनविरोध

Next


भडगाव : तालुक्यात घुसर्डी खुर्द, पिचर्डे, अंतुर्ली, वलवाडी या ४ गावांच्या ग्रा. पं. सदस्य पदाच्या ४ पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या. तर बोरनार ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ७ जागांसाठी होती मात्र लोकनियुक्त सरपंच पदासह ६ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. मात्र प्रभाग ३ मध्ये एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही जागा बिनविरोध निवङुन आली. अशा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या एकुण ५ सदस्य पदाच्या जागा बिनविरोध आल्या आहेत.
माघारीला १० रोजी अंतीम दिवशी चित्र स्पष्ट झालेहोते. तसेच तालुक्यातील वडगाव बु, भट्टगाव, गोंडगाव, भातखंडे या ४ ग्रामपंचायतीच्या ४ सदस्य पदाच्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ४ ही जागा आरक्षीत असल्याने जात प्रमाणपत्र नसल्याने रिक्त असल्याची माहीती भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर यांनी दिली.
बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. घुसर्डी येथे प्रभाग १ मध्ये पुनम जितेंद्र परदेशी, पिचर्डे येथे प्रभाग२ मध्ये रत्नाबाई भिमराव मोर, वलवाडी येथे प्रभाग १ मध्ये वानुबाई भिला मोरे, अंतुर्ली येथे प्रभाग ३ मध्ये ऊषाबाई जयवंतराव पाटील हे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तसेच बोरनार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये सदस्य पदासाठी गोपाळ रामदास माळी हे बिनविरोध निवङुन आले. आता बोरनारचे लोकनियुक्त सरपंच पद व ६ सदस्य पदासाठींच्या जागा रिक्त आहेत. नंतर या रिक्त जागांसाठी पुढे पुन्हा निवङणुकीचा कार्यक्रम लागु शकतो.

Web Title: 5 seats of 5 Gram Panchayats in Bhadgaon taluka are unanimously elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.