भडगाव रस्त्यावर एस.टी.अपघातात ४५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:49 PM2018-09-12T22:49:06+5:302018-09-12T22:51:16+5:30

45 passengers injured in road accident in Bhadgaon road | भडगाव रस्त्यावर एस.टी.अपघातात ४५ प्रवासी जखमी

भडगाव रस्त्यावर एस.टी.अपघातात ४५ प्रवासी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देएक तासांच्या प्रयत्नानंतर काढले चालकालाएस.टी.चालकाविरूद्ध गुन्हा दाखल









भडगाव : वाडे कडून भडगावकडे येणाऱ्या एस.टी.क्रमांक एमएच २० बीएल ०११२ ही बस हिवराच्या झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात ४५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार १२ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडे गावा मुक्कामी असलेली बस क्र.एम एच बी एल ०११२ ही भडगावकडे जात होती. या दरम्यान चालक वाल्मीक सोमा जाधव याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात बस उतरली. त्यामुळे समोर असलेल्या हिवरच्या झाडावर ही बस जाऊन धडकली.
या अपघातात एकुण ४५ प्रवाशी जखमी झाले. चालक, वाहकासह प्रवाशी, विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.
जखमींची नावे अशी
या अपघातात बस चालक वाल्मीक सोमा जाधव (वय ३५ रा. पाचोरा), सुभाष गणपत गोहील वाहक ( वय ५८ रा. कजगाव ता. भङगाव) , बबन महादु बैरागी (वय ५५ रा. वाडे ता. भडगाव), सपना बैरागी (वय २५ रा. वाङे,ता. भङगाव, विमलबाई बैरागी वय ३९ रा. रा. वाडे ता. भडगाव) सुधाकर दोधा पाटील (वय ६० रा. कनाशी, ता. भङगाव), पवन सुभाष बावीस्कर (वय १८ रा. निंभोरा ता. भङगाव), , वैशाली संभाजी पाटील वय १९ रा. बोदर्ङे, ता. भडगाव, मनिषा सुरेश पाटील वय १९ रा. बोदर्डे,ता. भडगाव, हर्षल पाटील वय १६ रा. कनाशी, ता. भडगाव, गणेश माधवराव पाटील वय १२ रा. कोठली ता. भडगाव, आकाश मधुकरराव गायकवाड वय १७ रा. कनाशी,ता. भडगाव, पंकज मल्हारी भिल्ल वय १५ रा. वडधे,ता. भडगाव, महेंद्र भालचंद्र महाजन वय १८, प्रशांत सोपान महाजन वय ८४, वंदना सोपान महाजन वय २४, अविनाश महाजन वय २४ रा. आडगाव ता. पारोळा येथे ४ जण वाडे येथून यात्रा करुन निघाले होते. रोशन राजेंद्र भोपे वय १७ रा. कनाशी,ता. भडगाव, विद्या भरत पाटील वय १७ रा. कनाशी, ता. भङगाव, दिशा शिवाजी पाटील वय १७ रा. कनाशी, ता. भडगाव, दिपाली संभाजी पाटील वय १४ रा. निंभोरा,ता. भडगाव, महेश दिनकर पाटील वय २० रा. गोंडगाव, ता. भडगाव, अनिता गुलाब पाटील वय १८, गायत्री जिभाऊ पाटील वय १७ रा. लोणपिराचे,ता. भडगाव, निकीता संजय पाटील वय १४ रा. कनाशी, ता. भडगाव, विशाल आत्माराम पाटील वय १६ रा. लोणपिराचे,ता. भडगाव, ललीत सुभाष पाटील रा. लोणपिराचे, ता. भडगाव, सचिन रविंद्र पाटील रा. बोदर्डे,ता. भडगाव, संज्योत शरद पाटील वय १८ रा. कनाशी,ता. भडगाव, युवराज वामन पाटील रा. लोणपिराचे,ता. भडगाव, प्रतिक संजय पाटील रा. कनाशी, ता. भडगाव, विशाल प्रभाकर पाटील रा. कनाशी, आत्माराम शंकर पाटील वय ६५ रा. कनाशी, अधिकराव महारु पाटील रा. कनाशी,, ऋषीकेश मधुकर बोरसे रा. कोठली, आरती विज महाजन वय १४ रा. लोणपिराचे ता. भडगाव, साहेबराव नगराज मोरे वय १९ रा. कनाशी, समाधान प्रकाश वैराडे वय १७ रा. कनाशी, सुरेश आण्णा सोनवणे वय १८ रा. कनाशी ता. भडगाव, अजय गुलाब मोरे वय १८ रा.लोणपिराचे, अश्विनी पाटील वय १७ रा. लोणपिराचे ता.भडगाव, अशा एकुण ४३ जखमींचा समावेश आहे.

Web Title: 45 passengers injured in road accident in Bhadgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.