Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:44 AM2018-09-15T11:44:04+5:302018-09-15T12:42:49+5:30

पर्यावरणपूरक उपक्रम

39 trees in the Jalgaon Ganesh Festival | Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

Next
ठळक मुद्देभारती पर्यावरण प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष संवर्धनासह मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठीही पुढाकारझाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा

जळगाव : गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात असताना गेल्या तीन वर्षांपासून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी धडपड करीत आहे. तीन वर्षात या संस्थेने गणेशोत्सावादरम्यान ३९ वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. इतकेच नव्हे तर मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार प्रचास करीत आहे.
गणेशोत्सव म्हटला म्हणजे या काळात वेगवेगळ््या संस्थांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक म्हणून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ गणेशोत्सवापूरताच मर्यादीत न ठेवता यासाठी संस्था बाराही महिने अखंडपणे काम करीत असते. यामध्ये तीन वर्षात संस्थेने अनेक ठिकाणी वृक्ष लागवड तर केलीच आहे, सोबतच गणेशोत्सवात ३९ वृक्षांची केवळ लागवडच न करता त्यांचे जतन करण्याचे काम केले आहे.
सर्व झाडे जगली
संस्थेच्यावतीने रामानंद नगर घाटामध्ये १९, द्वारकानगरमध्ये ११ तसेच महाबळमधील पशू चिकित्सलायनजीक ९ अशी कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर अशी विविध जातीचे ३९ झाडे लावली आहेत. या ठिकाणी केवळ झाडे लावून ती सोडून दिली नाही तर वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जतन करण्याचे काम केल्याने ही सर्व वृक्ष जगली आहे. द्वारकानगरात ११ वृक्षांची लागवड केल्यानंतर तेथील रहिवाशांनी प्रेरणा घेऊन आणखी १० वृक्ष तेथे लावली, हे विशेष.
झाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा
केवळ वृक्ष लावण्यावरच न थांबता लावलेल्या वृक्षांच्या परिसरात अथवा इतर कोठेही वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात लावलेली असल्यास त्या बाबत संबंधितांना सूचना देऊन ते काढण्यास सांगतात. त्यांनी न ऐकल्यास संस्था स्वत: या जाहिराती काढून झाडावरील खिळे काढून टाकते. यासोबतच झाडांच्या वाढीस कोठे अडथळा येत असल्यास ते दूर करण्याचेही काम संस्था करीत असते. यामुळे गणेशोत्सवात या ३९ झाडांसह इतरही अनेक झाडांचे संवर्धन यामुळे शक्य झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
पर्यावरणास घातक मूर्तींचा वापर टाळा
प्लॅस्टर आॅप पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणास धोका असल्याने त्या टाळून शाडू मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले जाते. त्यात तीन वर्षात बरेच यश आले असून त्यामुळे अनेक जण शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करूलागल्याचेसांगण्यातआले.
‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’
वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार करण्यासह गणेश विसर्जनादरम्यान मेहरुण तलावाची होणारी अस्वच्छता याकडेही संस्थेने सामान्यांसह मनपाचेही लक्ष वेधले आहे. यासाठी संस्थेने ‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’ अशी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याद्वारे तलावाची कशी अवस्था होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्याबाबत जागृत होण्याचा संदेश दिला जात आहे. ही चित्रफित मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनाही पाठविण्यात आली असून तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी संस्थेने केली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, पर्यावरणास घात ठरणाऱ्या मूर्तींचा वापर न करणे तसेच शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी संस्था तीन वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे आहे.
- सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती पर्यावरण प्रतिष्ठान.

Web Title: 39 trees in the Jalgaon Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.