जळगाव जिल्ह्यात ६ महिन्यात २८६ वीज चोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:04 PM2018-12-19T17:04:43+5:302018-12-19T17:07:46+5:30

महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले

286 electricity thieves in 6 months in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात ६ महिन्यात २८६ वीज चोरांवर कारवाई

जळगाव जिल्ह्यात ६ महिन्यात २८६ वीज चोरांवर कारवाई

Next
ठळक मुद्देवीज वितरण कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत माहितीसौभाग्य योजनेअंतर्गंत सव्वा लाख कुटुंबाना वीजजोडणी४ हजार प्रकरणांपैकी ३४७ जणांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले असून, वीजचोरी करणाºयांविरोधातही सहा कडक मोहिम सुरु केली राबविण्यात येत आहे. यामध्ये वीजेची चोरी करणाºया ४ हजार प्रकरणांपैकी, ३४७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सर्वांधिक कारवाई जळगाव शहरातील २८६ वीज चोरांवर करण्यात आली असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य अभियंता दीपक कुमठेकर माहिती देतांना पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सहज बिजली सौभाग्य योजनेची प्रभावी अंमल बजावणी करण्यामध्ये जळगाव परिमंडळ अग्रेसर आहे. या योजने अंतर्गंत आतापर्यंत जिल्ह्यात ५४ हजार ४८३, धुळ््यांत १७ हजार ४७२ व नंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ४०५ जणांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. तर २८ हजार कुटुंबाना वीज कनेक्शन देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच पैसे भरुन प्रलंबित १४ हजार ८२० कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व्दारे वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील ५६९८, जळगांव ६०१५ व नंदुरबार जिल्ह्यातील ३१०७ कृषीपंपांचा समावेश असल्याचेही कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी त्यांनी एकात्मिक उर्जा विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनांची माहिती देऊन. या योजने अंतर्गंत सुरु कामांची माहितीही दिली
४ हजार कोटींवर थकबाकी
यावेळी कुमठेकर यांनी महावितरणची जळगाव, धुळे व नंदुरबार मिळुन एकुण ४ हजार ३४६ कोटीचीं थकबाकी असल्याचेहीं सांगितले. यामध्ये जळगाव जिल्ह्यांत २ हजार ५९५ कोटी, धुळे १ हजार ३४ कोटी व नंदुरबार जिल्ह्यांत ७१६ कोटीचीं थकबाकी असल्याचे सांगितले. यामघ्ये सर्वाधिक कृर्षी विभागाची ३ हजार ५५१ कोटीचीं थकबाकी असून, सार्वजनिक पाणी पुरवठा वितरणाची २७० कोटी व घरगुती वीज ग्राहकांकडे ५८ कोटींची थकबाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, जळगाव महापालिकेकडेही पथदिव्यांची १ कोटी ३८ लाख रुपये थकबाकी आहे.
गो ग्रीन बिलावर दहा टक्के सवलत
ग्राहकांना आॅनलाईन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महावितरणने १ डिसेंबरपासून गो-ग्रीन वीजबील सेवाही उपलब्ध करुन दिली आहे. जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ईमेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारुन आॅनलाईन वीजबील भरतील. अशा ग्राहकांना वीजबीलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन प्रथम ‘कन्झ्युमर सर्व्हिस या लिंकवरुन कन्झुमर वेब सेल्फ सर्व्हिसमध्ये नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्ड तयार करणे गरजेचे असल्याचेही कुमठेकर यांनी सांगितले.

Web Title: 286 electricity thieves in 6 months in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.