१४ बैलजोड्या गाड्यांसह परस्पर विकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 08:55 PM2019-05-19T20:55:16+5:302019-05-19T20:56:44+5:30

फसवणूक : साखर कारखाना ठेकेदाराविरुद्धा गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

14 bullock cart sold and sold | १४ बैलजोड्या गाड्यांसह परस्पर विकल्या

१४ बैलजोड्या गाड्यांसह परस्पर विकल्या

googlenewsNext


अमळनेर : ऐन दुष्काळात तालुक्यातील ढेकू , पिंपळे , आणि आटाळे येथील शतेकऱ्यांच्या १४ बैलजोड्या या गाड्यांसह ऊस कारखान्याच्या ठेकेदाराने परस्पर विकल्या. एवढेच नाही तर उलटपक्षी १३ लाखाची नोटीस पाठवून छळ केल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
पालकमंत्र्यांनी दौºयावर असताना आपला मोर्चा ढेकू सिम गावाकडे वळवला तेव्हा ढेकू सिम येथे पिंपळे , आटाळे आणि ढेकू च्या प्रभाकर भावसिंग पाटील , जितेंद्र शिवाजी पाटील , विनोद लोटन पाटील या शेतकऱ्यांनी संयुक्तरित्या तक्रार केली की त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडीसाठी ठेकेदार बाळासाहेब कडूबाळ ताके यांना १४ बैलजोड्या व गाडे भाडेतत्वावर दिले होते कराराप्रमाणे त्याने आजपर्यंत बैलजोड्या व गाडे परत केले नाही. उलट पक्षी शेतकºयांना त्यांच्याकडे १२ लाख ९३ हजार रुपये घेणे बाकी असल्याची नोटीस कोटार्मार्फत दिली. त्याने दिलेल्या नोटीसीनुसार बैलजोड्या व गाडे शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विकल्या आहेत. याबाबत आम्ही तेथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो होतो तरी गुन्हा दाखल झालेला नाही. आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांना करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना दिलेत .
पालकमंत्र्यांकडे केल्या विविध मागण्या
यावेळी शेतकरी व गावकºयांनी पाणी पुरवठा योजनेची मागणी करून कायमस्वरूपी टंचाई दूर करण्याची मागणी केली. याबाबतही अधिकाºयांना उपायोजनेच्या सूचना पालकमंत्र्यानी केल्या. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अमळनेर तालुक्याच्या पीक विमा, चारा छावण्या, पाडलसरे धारणास निधी, दुष्काळी अनुदान, मराठा आरक्षण या विविध विषयांवर शेतकºयांनी धारेवर धरले. यावेळी सचिन पाटील, संजय पुनजी पाटील, गोकुळ पाटील, अनंत निकम, श्रीकांत पाटील, रतिलाल पाटील, जितेंद्र देशमुख अनेक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: 14 bullock cart sold and sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.