महिलेचा खून करून प्रेत पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:07 AM2018-04-03T01:07:23+5:302018-04-03T16:27:45+5:30

सातोना शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीजवळ सोमवारी दुपारी तीस वर्षीय महिलेचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

Woman killed and burried | महिलेचा खून करून प्रेत पुरले

महिलेचा खून करून प्रेत पुरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील सातोना शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीजवळ सोमवारी दुपारी तीस वर्षीय महिलेचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातोना शिवारात निम्न दुधना धरणाच्या भिंतीजवळ महिला अर्धवट पुरलेला मृतदेह असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी परतूर पोलिसांनी कळविले. माहिती मिळताच परतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संशयितांनी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलायात पाठवला. मृत महिलेच्या अंगात निळसर व पांढ-या रंगाची साडी आहे. मृतदेहाजवळ दोन लाल रंगाच्या पितळी कोटींग असलेल्या बांगड्या आढळून आल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात परतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील वर्णन असलेली महिला गायब असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी केले आहे.

Web Title: Woman killed and burried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.