अंगणवाड्या इमारतीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:39 AM2018-10-25T00:39:13+5:302018-10-25T00:39:42+5:30

जिल्ह्यातील १ हजार ९४६ अंगणवाड्यांपैंकी तब्बल ५४३ अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत उभारता आलेली नाही.

Without Aanganwadi Building | अंगणवाड्या इमारतीविना

अंगणवाड्या इमारतीविना

Next
ठळक मुद्देजालना : ५४३ अंगणवाड्या भरतात पारावर तर कुठेकुठे मंदिरात

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील १ हजार ९४६ अंगणवाड्यांपैंकी तब्बल ५४३ अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत उभारता आलेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, जि. प. शाळांच्या व्हरांड्यात भरतात, विशेष म्हणजे, यापैंकी ५४ अंगणवाड्या तर कुठे पारावर -मंदिरात भरवल्या जात आहेत.
अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ वर्षांपर्यंत बालकांना लसीकरण, पोषण आहार, आरोग्याच्या संदर्भ सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण व बाल संस्कराचे धडे दिले जातात. अलीकडे तीव्र कुपोषित बालकांसाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. जवळपास ५०० अंगणवाड्यांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर अंगणवाडी कार्यकर्ती- मदतनिसांच्या निगराणीत आरोग्य सेवा दिली जाते. आपल्या दर्जेदार सेवेच्या माध्यामातून जिल्ह्यात ८७ अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे. मात्र, असे असले तरी अजूनही ५४३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे त्यांची घुसमट चालू आहे. यातील २१४ अंगवाड्या शाळेच्या इमारतीत, ६४ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, १६४ इतर ठिकाणी भरतात.
तर दुसरीकडे जालना तालुक्यातील ५, बदनापूर तालुक्यातील ६, अंबड तालुक्यातील १९, घनसावंगी तालुक्यातील ७, परतूर तालुक्यातील ७, मंठा तालुक्यातील १, भोकरदन तालुक्यातील ६, जाफराबाद तालुक्यातील ३ असे एकूण ५४ अंगणवाड्या उघड्यावर भरतात. यासंर्दभात जि.प.चे महिला व बालकल्याण अधिकारी यु. एस. खरात यांना दुरध्वनीवरून संर्पक केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मंठा शहरातील जि.प. शाळेच्या आवरामधील अंगणवाडीच्या परिसरात अस्वच्छता आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे महिला व बालकल्याण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
धोकादायक अंगणवाडी
जिल्ह्यात अनेक अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. काही अंगणवाड्यांच्या छताचे पोपडे कोसळले आहेत, तर काही अंगणवाड्यांच्या भिंती, फरशा खचल्या आहेत.
आरोग्यास धोका
जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांच्या परिसरात अस्वच्छता आहे. या अंगणवाड्याजवळ घाणीचे सामाज्य परसरले आहे. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
लक्ष देण्याची गरज
सरकारकडून अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. परंतु, या निधींचा अधिकारी उपयोग करतांना दिसत नाही. त्यामुळे अंगणवाड्याची बक्कास अवस्था झाली आहे.

Web Title: Without Aanganwadi Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.