बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:56 AM2018-05-30T00:56:42+5:302018-05-30T00:56:42+5:30

जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

When the suffered farmers will get money ? | बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
बोंडअळी बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केल्यानंतर शासनाने शेतक-यांना बियाणे उत्पादक कंपन्या, विमा व शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी प्रशासनास ७३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मदत रक्कम शेतक-यांचा बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बाधित शेतक-यांना तात्काळ मदत वाटपाचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.
मात्र, मदत देण्यापूर्वी ज्या शेतक-यांची नावे गावातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावून आक्षेप हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच महसूल प्रशासनाकडून शेतक-यांच्या नावासमोर बँक खाते क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवरील महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांकडून या कामात वेळकाढूपणा सुरू आहे.
त्यामुळे जिल्ह्याला दोन आठवड्यांपासून अनुदान प्राप्त होवून त्याचे वाटप रखडले आहे. खरिपाच्या बी-बियाणे खरेदीला या अनुदानाचा उपयोग होईल, अशी आशा शेतक-यांना आहे.
अनुदान उशिरा मिळाल्यास शेतक-यांना ऐन वेळी उसनवारी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान वाटपासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
खरीप हंगाम : जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र घटणार
मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या क्षेत्र तब्बल ७८ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. या तुलनेत सोयाबीन पेरणीकडे शेतक-यांचा कल आहे. परिणामी सोयाबीनच्या पेºयामध्ये वाढ होणार आहे. शेतक-यांनी खात्रीशीर बियाणे घेवून आवश्यक प्रक्रियेअंती कपाशीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: When the suffered farmers will get money ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.