गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:05 AM2018-07-17T01:05:54+5:302018-07-17T01:06:43+5:30

गावठी पिस्तुलसह २ जिवंत काडतूस राहत्या घरात ठेवणाऱ्या शेख अली शेख जाफर (रा. हिना साबन फॅक्ट्री सिंधीकाळेगाव ता.जालना) यास तालुका जालना पोलिसांनी घरी छापा मारून पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

Village pistols and two live cartridges seized | गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गावठी पिस्तुलसह २ जिवंत काडतूस राहत्या घरात ठेवणाऱ्या शेख अली शेख जाफर (रा. हिना साबन फॅक्ट्री सिंधीकाळेगाव ता.जालना) यास तालुका जालना पोलिसांनी घरी छापा मारून पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी सिंधीकाळेगाव येथील हीना साबण फॅक्ट्री येथे शेख अली शेख जाफर याच्या घराची अचानक पंचासमक्ष झडती घेतली.
त्यात पलंगाच्या गादीखाली एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस मिळून आले. ही कामगिरी तालुका पोलिस ठाण्यातील पोहेकॉ कल्याण आटोळे, यशवंत मुंढे, नसीम पठाण, भागवत खरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणात यशवंत मुंढे यांच्या फिर्यादीवरून तालुका ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोहेकॉ कल्याण आटोळे करीत आहेत.

Web Title: Village pistols and two live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.