जालन्यात आवक वाढल्याने भाज्यांचे दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:27 AM2018-11-14T11:27:48+5:302018-11-14T11:29:16+5:30

भाजीपाला : जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक चांगली आहे

vegetable prices stable due to rising arrivals in Jalna | जालन्यात आवक वाढल्याने भाज्यांचे दर आवाक्यात

जालन्यात आवक वाढल्याने भाज्यांचे दर आवाक्यात

Next

जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक चांगली आहे, असे असतानाच आता चातुर्मास संपत आल्याने कांदा आणि लसणाची मागणी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे, असे असतानाही या दोन्ही वस्तूंचे दर मात्र अद्यापही वाढले नाहीत. येथील नवीन मोंढ्यात दररोज सकाळी भाज्यांची आवाजी बोलीने हर्राशी होते.

सध्या विदर्भातून फूल, पत्ता कोबीची आवक चांगली असून, मध्यंतरी ३५ रुपये किलोवर गेलेली भेंडी मात्र आता घसरली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारपेठेत भेंडीचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. मुळा, जांब तसेच टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, पालक, मेथीच्या भाजीची चांगली आवक आहे. सध्या लिंबाला चांगली मागणी आहे.

अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढत असल्याने विना दुधाच्या चहामध्ये लिंबू टाकून पिण्याची पद्धत रुढ झाल्याने देखील लिंबाला चांगली मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपल्याने भाज्यांची मागणी घटल्याने दर कमी झाल्याने भाज्यांचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, असे असल्याची माहिती घाऊक भाजी विक्रेते जी.बी. जाधव यांनी दिली. 

Web Title: vegetable prices stable due to rising arrivals in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.